ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

बिग ब्रेकिंग! 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर होणारं 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान जमा

Subsidy | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारकडून नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान (Subsidy) देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील 28 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी (Agriculture) पात्रता प्रक्रिया आणि बँकांची छाननी देखील पूर्ण झाली आहे. आता ही 50 हजारांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर (Financial) येत्या 15 दिवसांच्या आत जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळणार आहे.

वाचा: पीक विम्याचा मार्ग मोकळा! कोर्टाने कंपन्यांची याचिका फेटाळून शेतकऱ्यांना निधी वितरीत करण्याचे दिले निर्देश

बँकांची छाननी पूर्ण
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 28 लाख शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले आहे. 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची (Loan) नियमित परफेड केली असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलाय. आता कृषी विभाग (Department of Agriculture) आणि बँकांच्या माध्यमातून छाननी पूर्ण करण्यात आली आहे. ज्याच्या अंतिम याद्या जाहीर करण्याची तयारी देखील सहकार विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट
50 हजारांचे प्रोत्साहन अनुदानासाठी (Subsidy) 28.14 लाख शेतकरी पात्र झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी सरकारने तब्बल 10 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून दिवाळीच्या मुहूर्तावर गिफ्ट मिळणार आहे.

वाचा: पीएम किसानच्या 12 व्या हप्त्याची फिक्स माहिती! ‘या’ दिवशी होणार खात्यात जमा, केंद्रीय बैठकीत दिली माहिती

20 ऑक्टोबरपूर्वी रक्कम होणार जमा
बँकांच्या छाननी केल्यानंतर आठ दिवसांच्या आत या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर 8 दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. म्हणजेच 20 ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ज्याची माहिती वरिष्ठ सहकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी प्रचंड आनंदाची ठरणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! 50,000 incentive subsidy will be credited to the farmer’s account within 15 days

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button