ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Cotton Rate | कापूस उत्पादकांचे चांगले दिवस सुरू! दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या ताजे बाजारभाव

Cotton Rate | सध्या बाजारात कापसाची विक्री सुरू आहे. तर देशामधील कापूस हंगाम सुरू होऊन जवळपास चार महिने उलटले आहे. पहिल्या तीन महिन्यांमध्ये कापसाच्या दरामध्ये (Cotton Rate) चढ उतार पाहायला मिळाला होता. यामुळे कापूस उत्पादक (Cotton Production) शेतकरी चिंतेत पडले होते. परंतु आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Department of Agriculture) दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण आज कापसाच्या (Financial) दरात वाढ झाली आहे.

कापूस विक्री दबावात
देशामधील बाजारात कापसाचे दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी (Agricultural Information) देखील कापसाची विक्री काही प्रमाणात थांबवली. म्हणजेच गरजेपुरता कापसाची विक्री केली. यामुळेच कापसाची आवक दीड लाखांहून आता एक लाखांवर आली आहे. तर दुसरीकडे कापूस वायदे देखील सुरू होणार आहेत. परंतु, असे असले तरी देखील कापसाचे दर (Cotton Rate) अद्यापही दबावातच आहे. परंतू आज कापसाच्या दरात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

कापसाच्या दरात किती झाली वाढ?
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सध्या टिकून आहेत. परंतु देशातील बाजारपेठेत दर फारसे सुधारले नाहीत. देखील आज देशातील बाजारपेठेत प्रतिक्विंटल कापसाच्या दरात (Market Rate) 100 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळाला आहे. तसेच त्याची वाढ कायम होत राहिली तर शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

किती मिळतोय कापसाला भाव?
बाजारपेठेत 100 रुपयांची दर वाढलेली पाहायला मिळाली. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी 7 हजार 800 ते 8 हजार 300 रुपये दर मिळाला आहे. तसेच बाजारात सरकीचे दर 3 हजार 200 ते 3 हजार 700 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्याचबरोबर देशातील रुईचे दर 17 हजार 500 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्याचबरोबर यावर्षी हंगामामध्ये कापसाचे दर 8 हजार 500 ते 9 हजार 500 रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good days for cotton growers! Price increase of rupees, know the latest market price

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button