ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojna | तरुणांना मोठे उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी! ‘या’ योजनेंतर्गत तब्बल १० लाखांचा मिळणार कर्ज, जाणून घ्या निकष

Yojana | A golden opportunity for young people to become big entrepreneurs! A loan of 10 lakhs will be available under this scheme, know the criteria

Yojna | महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (Yojna ) महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना संबंधित प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के किंवा कमीत कमी १० लाख तर गट लाभार्थ्यांसाठी ३५ टक्के किंवा ३ कोटी रूपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या तरुण उद्योजकांनी खालील निकष पूर्ण करावेत:

  • अर्जदाराचे वय किमान १८ असावे.
  • अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा.
  • सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करून देण्याची पात्रता असावी.
  • प्रकल्प किंमतीच्या किमान १० टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील तरुण उद्योजक अर्ज करू शकतात. या योजनेमुळे महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना स्वयंरोजगाराची संधी मिळेल आणि राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगांचा विकास होण्यास मदत होईल.

वाचा : PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता ; “या” दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा, जाणून घ्या कधी ?

योजनेच्या काही प्रमुख वैशिष्ट्ये

  • सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सूक्ष्म व अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत लाभ
  • आजारलेल्या सूक्ष्म उद्योगांनाही बँक कर्जास पात्र होत असल्यास लाभ मिळणार
  • पारंपारिक आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळणार
  • एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) साठी प्राधान्य
  • दिल्या जाणाऱ्या ३५ टक्के अनुदानापैकी ६० टक्के केंद्र तर ४० टक्के राज्याचा वाटा असेल
  • सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करता येईल
  • एकाच लाभार्थ्याला योजनेंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल

योजनेची मुदत

ही योजना २०२०-२१ पासून २०२४-२५ या पाच वर्षांसाठी लागू असणार आहे.

या योजनेमुळे महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना स्वयंरोजगाराची संधी मिळेल आणि राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगांचा विकास होण्यास मदत होईल.

हेही वाचा :

Web Title : Yojana | A golden opportunity for young people to become big entrepreneurs! A loan of 10 lakhs will be available under this scheme, know the criteria

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button