ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy | ऊस पाचट कुट्टी यंत्रासाठी 8 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत अनुदान, त्वरित करा ‘असा’ अर्ज

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील जवळपास 65% नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेती (Agriculture) व्यवसायावर चालतो.

Subsidy | त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रामुख्याने शेतकरी ऊस पिकावर (Sugarcane Peak) जास्तीत जास्त भर देतात. मात्र ऊस पिकाच्या काढणीनंतर खली राहणारे ऊसाचे पाचट याची योग्य ती विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न आहे. अनेक शेतकरी हे पाचट शेतात जाळतात मात्र ही चुकीची पद्धत आहे. तर उसाच्या पाचटाची कुट्टी केल्याने शेताला एकप्रकारे खत (Fertilizer) मिळते. याच ऊस पाचट कुट्टी यंत्राच्या (Sugarcane Pachat Kutti Yantra) खरेदीसाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1 लाख 25 हजार रुपयांर्यंत अनुदान (Subsidy) दिले जाते. या यंत्राचे अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी या यंत्राच्या अनुदानासाठी अर्ज करू शकतात. या अंतर्गत दिले जाणारे अनुदान यांच्या संबंधातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लाभार्थ्यांना मिळणार ‘इतके’ अनुदान
13 मे 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला होता. ज्यामध्ये कृषी उन्नती योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत (Krishi Unnati Yojana National Food Security Campaign) वाणिज्यिक पिकांमध्ये कापूस आणि ऊस या पिकासाठी 2022-23 साठी वार्षिक कार्यक्रम राबवण्यासाठी 7 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. याच अंतर्गत ऊस पाचट कुट्टी यंत्रासाठी अनुदान दिले जाते. अल्पभूधारक शेतकरी एससी एसटी शेतकरी या सर्व शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त 50% किंवा 1 लाख 50 हजार रुपये अशा प्रकारे अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे बहूभूधारक शेतकरी व इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये अनुदान दिले जाते.

वाचा: Sugarcane | मुख्यमंत्र्यांचे ऊसाबाबत महत्वाचे निर्देश, ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरू अन् मिळणार ‘इतके’ अनुदान

या’ जिल्ह्यातील शेतकरी करू शकतात अर्ज
कृषी विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जमिनीमध्ये पाचट गाडून त्याचे कंपोस्ट खत (Compost manure) तयार करणं किंवा त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून खत तयार करणे. अशाप्रकारे शासन शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहे. जर शेतकऱ्याने मागणी केली तर त्यांना ऊस पाचट कुट्टी यंत्रसाठी अनुदान दिले जाणार आहे. कृषी उन्नती योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत ऊस पिकासाठी औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद लातूर बीड, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधील शेतकरी या योजनेचे अनुदान न करता अर्ज करू शकतात.

कसा कराल अर्ज?
mahadbt farmer scheme या ऑनलाईन पोर्टल जावून तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. यासाठी तुम्हाला लॉगिन करावे लागेल. लॉगिन करण्यासाठी तुम्हाला युजर आयडी पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्ड नसल्यास तुम्ही आधार कार्डच्या ओटीपीद्वारेही तुम्ही लॉगिन करू शकता. अर्ज लॉगिन झाल्यानंतर सर्व योग्य ती माहिती तुम्हाला भरावी लागेल. त्यासाठी तुम्हाला कृषी यांत्रिनिकिकरण हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर या योजनेच्या सर्व अटी मान्य कराव्या लागतील. सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म सबमिट करून तुमची अर्जाची प्रक्रिया पुर्ण करू शकता.

वाचा: Kusum Solar Yojna | कुसुम सोलर पंप योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यांमध्ये नोंदणी सुरू, त्वरित करा अर्ज

शेतकऱ्याला लॉटरी लागल्यानंतर अर्जापुढे विनर असे दाखवले जाईल. त्याचा एसएमएस आल्यानंतर कृषी यांत्रीनिकिरणासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे भरावी लागतील. त्यानंतर पूर्वसंमती दिली जाईल. कागदपत्र तपासणी झाल्यानंतर आणि पूर्व संमती दिल्यानंतर या यंत्राची खरेदी केलेले बिल अपलोड केल्यानंतर या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button