ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Garlic Price | लसूण उत्पादक शेतकरी मालामाल!लसणाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या किलोला किती मिळतोय भाव?

Garlic Price | लसणाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. भुवनेश्वर बाजारात लसणाचा दर (Garlic Price) 400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. अनेक भागात लसूण पिकाचे (Garlic Crop) मोठे नुकसान झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे. या महिन्यात किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. लसूणही महाग झाला आहे. लसणाचा दर 400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. लसणाच्या दरात एवढी वाढ का होत आहे? दर कमी होणार का? याबाबतची माहिती घेऊया.

लसणाच्या दरात वाढीची कारणे काय?
गेल्या काही आठवड्यात लसणाच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. भुवनेश्वर बाजारात लसणाचा दर 400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकाचे नुकसान झाल्यामुळे दुसऱ्या पिकाची लागवड करण्यास वेळ लागला. नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे.

वाचा | Garlic Cultivation | आता घराच्या घरीच रिकाम्या बाटलीत वाढवता येणार लसूण; जाणून घ्या कशी करावी लागवड?

लसणाचे दर कमी होतील का?
मध्य प्रदेशात लसणाची सर्वाधिक लागवड होते. खराब हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नवीन पीक येण्यास विलंब होत आहे. लसणाचे पीक बाजारात आल्यावर लसणाचे दर कमी होतील असा अंदाज आहे. बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते खरीप लसणाची आवक झाल्यानंतर भावात लक्षणीय घट होईल.फेब्रुवारी महिन्यात लसणाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. तर भारतात सुमारे 32.7 लाख टन लसणाचे उत्पादन होते.

Web Title | Garlic Price | Farmers who produce garlic are rich! A big increase in the price of garlic, know how much the price is getting per kilo?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button