ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Cotton Rate | कापूस उत्पादकांसाठी खुशखबर! कापसाच्या दरात वाढ; जाणून घ्या किती सुधारला भाव?

Cotton Rate | Good news for cotton growers! A rise in the price of cotton; Know how much the price has improved?

Cotton Rate | जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मध्यम धाग्याच्या कापूसाला (Cotton Rate) गेल्या पंधरवाड्यापासून दरात सुधारणा होत आहे. एफएक्यू दर्जाच्या कापसाला सरासरी 8000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहेत.

  • परभणी बाजार समिती:
  • गुरुवारी (14 मार्च) रोजी 2500 क्विंटल कापसाची आवक होती. नंबर एक प्रतीच्या कापसाला 7900 ते 8000 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 7940 रुपये दर मिळाला.
  • फरदड कापसाला 7300 ते 7800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 7 ते 13 मार्च या कालावधीत 6825 क्विंटल कापसाची आवक झाली. सरासरी 7950 ते 8045 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

वाचा | Subsidy | शेतकऱ्यांच्या पोरांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारं लग्न करणाऱ्या जोडप्यांना देणार 25 हजार, ‘असा’ घ्या लाभ

मानवत बाजार समिती
बुधवारी (13 मार्च) रोजी 5000 क्विंटल कापसाची आवक होती. प्रति क्विंटल 7700 ते 8080 रुपये आणि सरासरी 8000 रुपये दर मिळाला. 9 ते 13 मार्च या कालावधीत 18,550 क्विंटल कापसाची आवक झाली. सरासरी 7700 ते 8125 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

शेतकऱ्यांसाठी दिलासा
फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत कापसाच्या दरात घट होत होती. मार्चमध्ये दरात सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील 30 ते 35 टक्के शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक आहे.

Web Title | Cotton Rate | Good news for cotton growers! A rise in the price of cotton; Know how much the price has improved?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button