ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याबाजार भाव

Cotton Rate | कापूस उत्पादकांना मोठा दिलासा! कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या किती मिळतोय भाव?

Cotton Rate | आपल्या शेतमालाला किती भाव मिळतोय यावर शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. शेतमालाचे दर सातत्याने बदलत असतात. शेतमालाचा हमीभाव ठरलेला असतो, परंतु बाजारात चढ-उतार पाहायला मिळतात. आता कापूस (Cotton Rate) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्याचं कारण म्हणजे कापसाच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कापसाच्या दरात (Cotton Rate) किती वाढ झाली आहे आणि ही वाढ नक्की कोठे झाली आहे.

कसे राहिले कापसाचे दर?
या कापसाच्या दरात जोरदार वाढ होईल असा अंदाज होता. शेतकऱ्यांनी देखील आपल्या कापसाला (Cotton Rate) प्रतिक्विंटल दहा हजार रुपयांचा दर मिळेल अशी अपेक्षा धरली होती. परंतु कापसाच्या दराने दहा हजार रुपयांचा टप्पा गाठला नाही. एकंदरीत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कापसाला आठ हजार रुपये दर मिळाला. कापसाला मिळणारा 8 हजार रुपये हा दर जास्त काळ टिकला नाही, तर मे महिन्यात कापसाच्या दराने थेट निच्चांकी गाठली.

बाजारात वाढली कापसाची आवक
मे महिन्यात कापसाचे दर अगदी 6 हजार ते 7 हजार रुपये या दरम्यान राहिले. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या वाट बघून आहे त्या दरात कापूस बाजारात आणला. त्यामुळे बाजारात कापसाची आवक वाढली आणि त्याचा थेट परिणाम दरावर दिसू लागला आहे.

कापसाच्या दरात किती झाली वाढ?
परंतु आता परभणी जिल्ह्यात कापसाच्या दरात काही दिवसांपासून 500 ते 700 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळत आहे. तर परभणी बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान 6 हजार 600 ते कमाल 7 हजार 575 रुपये दर मिळत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big relief for cotton growers! Increase in the price of cotton by ‘so much’ rupees, know how much is getting?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button