ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Wheat Price hike | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ कारणांमुळे गव्हाच्या किंमतीत होणार वाढ?

सातत्याने शेतमालाचे भाव हे कमी जास्त होत असतात.

शेतीत (Agriculture) कधी शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो तर कधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक (Financial) फायदा होतो. मात्र यंदा गहू उत्पादक शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकाबाबत (Crop) दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण काही कारणास्तव आगामी काळात गव्हाच्या किमतीमध्ये (Wheat Price Hike) मोठ्या प्रमाणात दरवाढ होण्याची शक्यता आहे. गहू (Wheat) उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. चला तर मग गव्हाची दरवाढ होण्याबाबतची सविस्तर कारणे जाणून घेऊयात.

गव्हाच्या दरात वाढ होण्याची कारणे काय?
खरं तर सरकारने जवळपास 444 लाख टन गहू खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु सरकारने केवळ 144 लाख टन गहू खरेदी केला. त्यामुळे सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात बचत झाली. म्हणजे सरकारचे जवळपास 73 लाख कोटी रुपयांची बचत झाली. शेतकऱ्यांकडून सरकार एमएसपी भावात गव्हाची खरेदी करत. त्यानंतर तोच गहू गरीब नागरिकांना कमी दरात किंवा सवलतीवर विकला जातो. सर्वांसाठी सरकारला यामध्ये प्रचंड आर्थिक खर्च करावा लागतो.

वाचा: Share Market | शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांची हवाचं! सेन्सेक्स आणि निफ्टीने मारली उंच उडी, जाणून घ्या सविस्तर…

सरकारकडून यंदा गव्हाची खरेदी कमी झाल्यामुळे सरकारच्या साठ्यात कमतरता भासणार आहे. याचाच परिणाम पाहता खुल्या बाजारातील गव्हाचे दर वाढू शकतात. इतकचं नाहीतर या हंगामामध्ये गव्हाचे उत्पादन कमी निघाले. आहे कारण अनेक राज्यांमध्ये गावाला उष्णतेचा तडाका बसला आहे. परिणामी उत्पादन क्षमतेत घसरण झाली आहे. उत्पादनात घट झाली असली तरी जागतिक स्तरावर गव्हाला प्रचंड मागणी होती. त्यामुळे गव्हाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढले आणि याच कारणामुळे गव्हाचे दरही वाढले.

वाचा: शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यात करा ‘या’ भाजांची लागवड अन् कमवा बक्कळ नफा

खुल्या बाजारात वाढणार गव्हाचे दर?
सरकारकडून गव्हासाठी प्रतिक्विंटल 2015 रूपये इतका हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतु खुल्या बाजारात 100 ते 200 रुपयांनी हमीभावापेक्षा जास्त दर मिळत होता. जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खुल्या बाजारातच गव्हाची विक्री केली आणि याच कारणामुळे यंदा सरकारकडून गव्हाची खरेदी कमी झाली. केवळ विविध योजनांच्या माध्यमातून कमी दरात विकला जाईल इतकाच गव्हाचा साठा आहे. त्यामुळे खुल्या बाजारात गव्हावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडे अधिकचा गहू उपलब्ध नाही आणि याच कारणामुळे गव्हाच्या दरात यंदा खुल्या बाजारात मोठी वाढ होऊ शकते. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:केश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील ‘हा’ स्टॉक गाजवतोय मार्केट, खरेदीसाठी गुंतवणूकदारही…

Agricultural Census | देशात अकरावी कृषी गणना होणार डिजिटल स्वरूपात, जाणून घ्या काय होणार फायदा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button