ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Census | देशात अकरावी कृषी गणना होणार डिजिटल स्वरूपात, जाणून घ्या काय होणार फायदा?

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे

Agricultural Census | जेथे जवळपास 65 टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह शेती (Agriculture) व्यवसायावर अवलंबून असतो. कृषी क्षेत्रावर विविध बदल घडताना दिसून येतात. त्याचवेळी देशात केंद्र सरकारकडून दर पाच वर्षांनी कृषी गणना (Agricultural Census) केली जाते. मात्र यावेळी कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे ही कृषी गणना पुढे ढकलण्यात आली होती. आता या कृषी गणनेला मुहूर्त लागला आहे. याबाबत केंद्रीय कृषी (Agriculture in Maharashtra) आणि शेत कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी माहिती दिली आहे.

काय म्हणाले नरेंद्र सिंह तोमर?
ऑगस्ट महिन्यामध्ये दर पाच वर्षांनी होणारी 11 वी कृषी गणना होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, “भारत देशासारख्या मोठ्या देशात कृषी गणनेचा फायदा होणार आहे. ज्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढीवर भर दिला जात आहे. इतकच नाही तर शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावे, तसेच छोटे शेतकरी संघटित करून त्यांचे सक्षमीकरण करणे. त्या शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) फायदा होईल अशा पिकांकडे आकर्षित करणे, त्याचबरोबर त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता ही जागतिक मानकांच्या बरोबरीची असल्याची खात्री करणे,” अशी माहिती तोमर यांनी दिली आहे.

वाचा:काय सांगता? ‘या’ चॉकलेटच्या सेवनाने गाय-म्हशीच्या दुधात होते वाढ अन् आजारही राहतात दूर

कशी होणार यंदाची कृषी गणना?
सध्या संपूर्ण जग आधुनिकतेकडे वळत आहे. छोट्यातील छोटी आणि मोठ्यातील मोठी गोष्ट डिजिटल होत आहे. त्याचवेळी शेतीत देखील आधुनिकीकरण करण्यात येत आहे. आता ई-पीक पाहणी देखील डिजिटल स्वरूपाची झाली आहे. त्याचवेळी आता कृषी गणना देखील डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहे. याचा अर्थ कृषी गणनेत देखील डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात येणार आहे. ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल.

वाचा: Tractor | पेट्रोल डिझेलच नो झंझट! शेतकऱ्यांनो थेट मनुष्याच्या मुत्रावर चालणार ट्रॅक्टर, जाणून घ्या कोणता आहे हा ट्रॅक्टर?

काय होणार फायदा?
कृषी गणना डिजिटल स्वरूपात होणार असल्याचे नक्कीच मोठे फायदे होणार आहेत. डिजिटल कृषी गणनेत मोबाईल ऍपच्या आधारे माहिती गोळा केली जाणार आहे. या डिजिटल कृषी गणनेसाठी डेटा संकलन करण्यासाठी पोर्टल आणि मोबाईल ॲप देखील लाँच करण्यात आले आहे. कृषी क्षेत्राची संपूर्ण माहिती आता डिजिटल स्वरूपात करण्यात आल्याने कित्येक राज्यांचे नोंदी डिजिटल स्वरूपात झाल्या आहेत. त्याचमुळे या कृषी गणनेला अधिकचा वेग मिळणार आहे. याचमुळे कृषी गणना करण्यासाठी माहिती वेगात गोळा करणे शक्य होणार आहे.

कोणती माहिती घेतली जाईल?
शेतकऱ्यांची संख्या, वय, शैक्षणिक स्तर, जमीन धारणेचा आकार, वर्गवार तपशील, तसेच जमीन मालक आणि भाडेकरूंची संख्या, शेतातील मातीचे आरोग्य, पीक पद्धती, बदलते सिंचन साधने, शेती याबाबत सर्व गोष्टींची माहिती घेतली जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा: SBI | बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून वागणूक मिळत नाहीये? तर थेट नोंदवा ऑनलाईन तक्रार, जाणून घ्या प्रक्रिया

राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील ‘हा’ स्टॉक गाजवतोय मार्केट, खरेदीसाठी गुंतवणूकदारही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button