ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

सरकारची मोठी घोषणा; कोरोना ग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई जाहीर; पहा किती मिळणार रक्कम?

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (National Disaster Management Authority) सर्वोच्च न्यायालयाने माहिती दिली आहे की, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई ठरवण्यात आली आहे. या नुकसानिस कुटुंबाला सरकार आर्थिक (Government economic) पाठबळ देणार आहे. सर्व कोरोना ग्रस्त कुटुंबाना म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्ती मृत्यू पावला त्या कुटूंबाला (family) भरपाई मिळणार असल्याची सूचना दिल्या आहेत.

वाचा –

50 हजार रुपयांची भरपाई मिळणार –

मृत्यूसाठी प्रत्येक कुटुंबाला 50,000 रुपयांची भरपाई मिळेल. हा पैसा राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून मिळणार आहे. वास्तविक, न्यायालयाने (court) किमान नुकसान भरपाईबाबत मार्गदर्शक सूचना मागितली होती.

अशा आपत्तीमध्ये लोकांना नुकसान भरपाई देणे हे सरकारचे वैधानिक कर्तव्य असल्याचे न्यायालयाने (court) म्हटले आहे. 30 जून रोजी दिलेल्या आदेशात 777 व्यवस्थापन प्राधिकरणाला 6 आठवड्यांत भरपाईची रक्कम निश्चित केल्यानंतर राज्यांना माहिती देण्यास सांगितले होते. पण नुकसानभरपाईची रक्कम किती असेल हे ठरवण्याचे काम न्यायालयाने सरकारवर (government) सोडले होते. शेवटी सरकारने यावर निर्णय घेतला आहे.

वाचा –

मृत्यूच्या प्रमाणपत्रात असे लिहिले पाहिजे की मृत्यूचे कारण कोरोना आहे. अशा स्थितीत भरपाई योजना सुरू झाली तरी लोक या नुकसान भारपाईचा लाभ घेऊ शकतील. यावर न्यायालयाने म्हटले होते की, कोरोनामुळे मृत्यू (Death by corona) झालेल्यांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रांमध्ये मृत्यूचे कारण स्पष्टपणे लिहिले पाहिजे. तरच त्या कुटूंबाला नुकसान भरपाई मिळणार आहे. प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केली पाहिजे. जर दिलेल्या प्रमाणपत्राविरोधात कुटुंबाच्या काही तक्रारी असतील तर ती सोडवली जाईल व लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button