ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना
ट्रेंडिंग

केंद्र सरकारने भरपूर सबसिडी मिळणाऱ्या “या” ‘4 कृषी यंत्र योजना’ सुरू केल्या; पहा कोणत्या आहेत योजना?

The central government has introduced adequate subsidy schemes "or" '4 agricultural systems'; What is the plan?

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना कृषी यंत्रावर अनुदान दिले जाणार आहे. भारतातील शेती क्षेत्रावर (On the agricultural sector) अवलंबून असणारी लोकसंख्या मोठी आहे. या अववलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार (Central Government) नेहमीच नवनवीन योजना राबवत असतं. शेतकऱ्यांचे कमी खर्चात अधिक उत्पन्न निघावे म्हणून सरकार काहीतरी प्लॅन नेहमी काढत असतं.

प्रत्येक शेतकरी कृषी यंत्रे (Agricultural machinery) विकत घेऊ शकत नाही म्हणून आता केंद्र सरकारने लहान शेतकऱ्यांचा विचार करून कृषी मशिनरी सबसिडी योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल आपण सविस्तर पाहूया..

वाचा: शेतकऱ्यांनो घरी बसून 72 तासांच्या आत नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्या; ती कशी? वाचा सविस्तर..

राष्ट्रीय कृषी विकास योजना –

ही योजना केंद्र सरकाने 29 मे 2017 राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणून सुरू केली होती. ही राज्य योजनेतून शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिले जात होते. नैसर्गिक संसाधने आणि तंत्रज्ञान तसेच कृषी हवामान (Agricultural climate) लक्षात घेऊन शेती विकसित करण्यासाठी ही योजना आणली होती. या जिल्हा आणि राज्यांसाठी कृषी योजना तयार केल्या होत्या. फार्म मशीनीकरण, प्रगत आणि महिला अनुकूल उपकरणे, अवजार यासाठी मदत दिली जाते.

नाबार्ड कर्ज :-

या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर 30 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाते. या सोबत 100 टक्के पर्यंत सबसिडी इतर कृषी यंत्रासाठी दिली जाते. शेती विकसित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार करून ही सबसिडी दिली जाते.

वाचा: शेतजमिनीच्या 7/12 मध्ये झाले हे मोठे 11 बदल, जाणून घ्या कोणकोणते बदल केले आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन :-

या योजनेतुन कृषी उत्पादकता (Agricultural productivity) सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनेचा प्रमुख उद्देश नवीन कृषी यंत्रे (Agricultural machinery) खरेदी करण्याऐवजी जुनी यंत्रे अधिक चांगली बनवा. कारण कृषी मशीनरीचा सतत वापर केल्याने काही अडचणी येतात. अशा वेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान मधून कृषी यंत्रणेचा लाभ घेऊ शकता.

वाचा: पुढचे 5 दिवस “या” पिकांची अशी घ्या काळजी; अन्यथा नुकसानास बळी पडाल..

कृषी यंत्रांवर अनुदान कसे मिळवायचे :-

कृषी यंत्रांवर अनुदानाची प्रक्रिया दोन प्रकारे असते.
1) थेट रोख अनुदान
2) अप्रत्यक्ष अनुदान.
थेट रोख रकमेच्या स्वरूपात आहे जे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. व अप्रत्यक्ष अनुदान कृषी उत्पन्न करमुक्त उत्पन्नसाठी आहे.

अनुदानासाठी लागणारे कागदपत्रे – मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार कार्ड, पॅन कार्ड, बँकेकडून प्रत (स्टेटमेंट), खात्याचे तपशील, नाव आणि जन्मतारीख, संपर्क माहिती, अर्ज आणि पेमेंट पावती इ.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button