lang="en-US"> सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचा राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यांतून प्रवास - मी E-शेतकरी

Highway | सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचा राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यांतून प्रवास, जाणून घ्या किती जमीन केलीय अधिक्रमित

राज्यात आता मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतुकीचे काम सुरू आहे. अरबी समुद्राला बंगालच्या उपसागराची जोडणारा देशातील 5 राज्यांना एकमेकांशी कनेक्ट करणारा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचा ( Surat - Chennai Greenfield expressway ) राज्यातील 5 जिल्ह्यांतून प्रवास होणार आहे.

Highway | सोलापूर जिल्ह्यातील नवीन गावांचा समावेश झालेल्या सर्वे नंबरची यादी (Survey number list)आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील काही कामांची यादी प्रकाशित करण्यात आली होती. ज्यामध्ये उत्तर सोलापूर (North Solapur) आणि दक्षिण सोलापूरमधील (South Solapur) काही गावे वगळण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत आता नवीन आदेशाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.

किती जमीन करण्यात आली अधिक्रमित?
24 जून 2022 रोजी यांसंबंधातील एक सूचना प्रकाशित करण्यात आली आहे. या माध्यमातून 18 गावातील 320 सेक्टर जमीन अधिक्रमित केले जाणार आहे. या संबंधातील नोटिफिकेशन गॅजेट हे 24 जून 2022 रोजी प्रकाशित करण्यात आले आहेत. हे गॅझेट ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. ज्यासाठी https://egazette.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर तुम्हाला याबाबत सर्व माहिती मिळेल.

वाचा: Cabinet Decision | औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामांतर अन् उस्मानाबादचे ‘धाराशिव’; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील ‘हे’ महत्वाचे निर्णय

वाचा: Mahindra | शेतकऱ्यांच्या राणीची प्रतीक्षा संपली! नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनमध्ये शेतकऱ्यांसाठी बसवण्यात आलं ‘हे’ फिचर

कोणत्या जिल्ह्यातून जाणार महामार्ग?
या योजनेत महाराष्ट्र राज्याला एकूण 11 महामार्ग लाभणार आहेत. देशातील एकूण 44 आर्थिक कॉरिडॉरमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी तीन कॉरिडॉर आहेत. मुंबई-कोलकाता, मुंबई-आग्रा आणि सुरत-नागपूर या तीन कॉरिडॉरमुळे उत्तर महाराष्ट्रात प्रगतीशील महामार्ग होणार आहेत. तर या च भारतमाला योजनेअंतर्गत सुरत-चेन्नई हा महामार्गही प्रस्तावित आहे. ‘सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे’ हा महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या ५ जिल्ह्यातून जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Exit mobile version