ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | शेतकऱ्यांनो ‘या’ योजनेंतर्गत नव्या आणि जुन्या विहिरींसाठी मिळतंय अनुदान, पात्रता जाणून त्वरित करा अर्ज

Yojana | शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. यासाठीच शेतकऱ्यांना पाण्याची साठवणूक करण्यासाठी विहीर खांदणे गरजेचे आहे. परंतु यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना (Agriculture) आर्थिक भांडवल लागते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana) सरकारने आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी आर्थिक (Financial) सहाय्य मिळते. चला तर मग या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो आणि अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना Mahadbt Farmer Scheme Portal वर अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत (Department of Agriculture) राबविण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे सोडून राज्यामधील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तर जुन्या विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये अनुदान दिले जाते. Mahadbt Farmer Scheme Portal या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करून अनुदानाचा (Subsidy) लाभ मिळवू शकता.

वाचा: पारंपारिक शेतीला प्राधान्य देत शेतकऱ्यांनी 250 एकरात केली गवती चहाची शेती, जाणून घ्या किती कमावतात नफा?

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:-
• नवीन विहिरीसाठी सक्षम प्राधिकारीकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अनिवार्य
• 7/12 व 8-अ चा उतारा आवश्यक
• वार्षिक उत्पन्नाचा दाखला
• लाभार्थी अपंग असल्यास त्याचा पुरावा (प्रमाणपत्र).
• शेतजमिनीचा दाखला आणि विहीर नसल्याचे प्रमाणपत्र.
• विहीर असल्यास विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
• त्याचबरोबर भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला असणे आवश्यक.
• कृषि अधिकारची क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र असणे आवश्यक.
• गट विकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र व जागेचा फोटो अनिवार्य.

वाचा: पीएम किसानच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; लाभार्थी यादीत त्वरित तपासा तुमचे नाव

योजनेसाठी आवश्यक पात्रता:-
• या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सदर व्यक्ती अनुसूचित SC जाती प्रवर्गातील असणे आवश्यक.
• • सदर व्यक्तीने जातीचा दाखला जोडणे बंधनकारक.
• सदर व्यक्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही दीड लाखापर्यंतच असणे आवश्यक.
• • जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करावा.
• त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखलाही सादर करणे आवश्यक.
• या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे 0.20 हेक्टर ते 6 हेक्टरपर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे अनिवार्य आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers are getting subsidy for new and old wells under this scheme, know the eligibility and apply immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button