ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

या जिल्ह्याचे मुरघास मशीन अनुदान अर्ज सुरू, 10 लाख रुपयांपर्यंत लाभार्थ्यांना अनुदान जाहीर..

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशीन अनुदान या मशीनसाठी 10 लाख रुपये म्हणजेच 50% अनुदान दिले जाते. केंद्र शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियान 2022 अंतर्गत सन 2021-2022 या वर्षात दिलेल्या मंजुरीनुसार मुरघास निर्मिती करिता सायलेज बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी अर्थसाहाय्य ही बाब राबविली जात आहे.

वाचा –

संस्थेने लाभार्थ्यांची मशिनरीची (सायलेज बेलर, किमान 2 मे. टन प्रति तास क्षमतेने हेवी ड्युटी कडबाकुटी यंत्र, ट्रॅक्टर व ट्रॉली, वजन काटा, हार्वेस्टर, मशीन, शेड) खरेदी केल्यानंतर पडताळणी करून निधी संस्थेच्या / लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल.

50% निधी उपलब्ध –

या योजनेअंतर्गत प्रति मुरघास निर्मिती युनिट प्रकल्प खर्च 20 लाखाकरिता 10 लाख रुपये (50 टक्के केंद्र हिस्सा) निधी असून उर्वरीत 50 टक्के रु 10.00 लक्ष संस्थेने स्वतः खर्च करायचे आहेत. सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादन संघ / संस्था, शेतकरी उत्पादन कंपनी स्वयं सहाय्यता बचतगट व गोशाळा/ पांजर पोळा संस्था यांना द्यायचा आहे.

सदर अर्जाचा नमुना पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (वि) यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ लातूर जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील सहकारी दूध उत्पादक संस्था / संघ , शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा / पांजरपोळा / गोरक्षक संस्था यांना अर्ज भरता येईल. या योजनेसाठी संस्थेची निवड करताना याच प्राधान्य क्रमाने निवड करावयाची आहे. जिल्ह्यातील एकाच संस्थेला योजनेचा लाभ देणार आहेत.

वाचा –

दिनांक 25 जानेवारी 2022 ते 01 फेब्रुवारी 2022 या कालावधीत लाभार्थी निवड –

राष्ट्रीय पशुधन अभियान 2021-2022 (सर्वसाधारण प्रवर्ग) अंतर्गत (एन एल एम) मुरघास निर्मिती करीता लातूर जिल्ह्यामध्ये 01 (एक) सायलेज (मुरघास) बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी दिनांक 25 जानेवारी 2022 ते 01 फेब्रुवारी 2022 या कालावधीत लाभार्थी निवड प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. नानासाहेब सखाराम कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

अर्ज या ठिकाणी उपलब्ध –

अर्जाचा नमुना पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (वि) यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे . या योजनेचा लाभ लातूर जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील सहकारी दूध उत्पादक संस्था / संघझ शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था, स्वयंसहायता बचत गट व गोशाळा / पांजरपोळ / गोरक्षक संस्था यांना अर्ज भरता येईल. या योजनेसाठी संस्थेची निवड करताना याच प्राधान्य क्रमाने निवड करायची आहे. जिल्ह्यातील एकाच संस्थेला योजनेचा लाभ देणार आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button