ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana | राज्यातील विधवा, दिव्यांग, दुर्बल महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत; जाणून घ्या सरकारची ही योजना आहे तरी काय?

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana | monthly financial assistance to widows, disabled, weak women of the state; Know what is the plan of the government?

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana | महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana) समाजातील विधवा, दिव्यांग, दुर्बल महिलांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेद्वारे निवडक घटकांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते.

योजनेचा उद्देश:
या योजनेचा उद्देश समाजातील निराधार आणि अत्यंत गरजू घटकांना आर्थिक आधार देणे हा आहे. या योजनेद्वारे त्यांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करण्यास मदत होईल.

  • योजनेचे लाभार्थी:
  • विधवा महिला
  • दिव्यांग व्यक्ती
  • दुर्धर आजारग्रस्त
  • अनाथ
  • परित्यक्ता
  • देवदासी
  • अत्याचारित महिला
  • वेश्या व्यवसायातून मुक्त महिला
  • तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाची पत्नी
  • 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री

वाचा |  Widow Pension Scheme | विधवा महिलांना महिन्याला मिळणार आर्थिक आधार! काय आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना?

  • अर्ज करण्याची प्रक्रिया:
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात संपर्क साधावा.
  • तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकता.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, खालील लिंकवर क्लिक करा: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate
  • आवश्यक कागदपत्रे:
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • वयाचा पुरावा (18 ते 65 वर्षे)
  • किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा
  • विधवा महिलांसाठी पतीच्या मृत्यूचा दाखला
  • दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्व प्रमाणपत्र (किमान 40%)
  • अनाथ मुलांसाठी अनाथालयाचा दाखला
  • दुर्धर आजारासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला (दिव्यांग व्यक्तीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹50,000/-)
  • आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स, निवासस्थानाचा पुरावा, अर्जदाराचा फोटो इत्यादी.

Web Title | Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana | monthly financial assistance to widows, disabled, weak women of the state; Know what is the plan of the government?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button