ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य
ट्रेंडिंग

Chest Pain | छातीत दुखतंय तर चुकूनही दुर्लक्ष करू नका! असू शकतात ‘हे’ गंभीर आजार, जाणून घ्या…

Chest Pain | आपल्या शरीराच्या काही न काही कुरबुरी नेहमी सुरूच असतात. यामध्ये डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी जाणवत असते. बऱ्याचदा लोकांना छातीदुखीचा देखील त्रास होतो. मात्र लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात किंवा पित्तामुळे दुखत असेल असा निष्कर्ष लावतात. मात्र छातीच्या दुखण्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये. कारण छातीत तीव्र वेदना होणे, हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. जाणून घेऊयात छातीत दुखण्याची कारणे…

वाचा: शरीरासाठी युरिक ऍसिड आहे घातक! ‘या’ भाज्या खाल्ल्याने म्हातारंपणीही राहाल तंदुरुस्त, जाणून घ्या एका क्लिकवर

छातीत दुखण्याची कारणे

लोकांना विविध कारणांमुळे छातीत दुखते. कधीकधी या वेदना सौम्य असतात तर कधी कधी तीक्ष्ण असतात. डॉक्टरांच्या मते छातीत दुखण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१) हृदयविकाराचा झटका

२) हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा

३) हृदयाच्या स्नायूंना सूज येणे.

४) न्यूमोनिया

५) रक्ताच्या गुठळ्या

६) फुफ्फुसाभोवती सूज

७) पॅनीक अटॅक

८) छातीत जळजळ

९) ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारा त्रास

१०)ओटीपोटात पेटके

११) जड जेवण घेतल्याने

छातीत दुखत असल्यास करा ‘हे’ उपाय

१) तुळशीची पाने – तुळशीची पाने चघळल्याने छातीचा त्रास कमी होतो. यासाठी तुम्ही चहामध्ये देखील तुळशीची पानेही पिऊ शकता.

२) व्हिटॅमिन D ने समृद्ध असणाऱ्या गोष्टींचे सेवन – व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कधीकधी छातीत दुखू लागते. अशा परिस्थितीत मशरूम, दूध, फॅटी फिश यांसारख्या व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन करा.

३) लसणाचे सेवन करा – जर तुम्हाला छातीत जळजळ, वेदना किंवा जडपणा जाणवत असेल तर तुम्ही लसणाचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. यासाठी सगळ्यात आधी लसणाचा रस काढा आणि त्यानंतर ते एक कप कोमट पाण्यात मिसळून प्या.

४) आपला डावा हात सरळ करून मूठ बांधा. ती मूठ पालथी होईल असा हात वळवून हात ताठ करा. त्यानंतर, ज्या ठिकाणी पंजा संपतो त्या बिंदू पासून कोपरापर्यंत, त्याचा मध्य बिंदू शोधा. आता त्या बिंदूवर बोटाने/अंगठ्याने किंचित दाब देऊन, तेथे दुखते आहे कां, याचा अंदाज घ्या. जर दुखत असेल तर ३-५ मिनिटे ॲक्युप्रेशर द्या.

४)छातीचे दुखणे टाळण्यासाठी मेडीटेशन हा सर्वात सोप्पा उपाय आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button