ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! केंद्राचा मोफत रेशनबाबत मोठा निर्णय; देशभरात नवा नियम लागू

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने रेशनिंगच्या नियमांमध्ये (Ration Card Rules) मोठा बदल केला असून, त्याचा फायदा करोडो लोकांना होणार आहे. देशभरात मोफत रेशन (Free Ration Grains) देण्याच्या सुविधेसोबतच सरकारने पोर्टेबल रेशन कार्डची सुविधाही सुरू केली आहे. ही सुविधा नुकतीच अनेक राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. मात्र लवकरच ती देशभरात सुरू करण्याची योजना आहे.

वाचा: ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

जुन्या कार्डवरच मिळणार सुविधा
पोर्टेबल रेशन कार्डची (Portable Ration Card) सुविधा लागू झाल्यानंतर देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला रेशनची सुविधा (Ration Facility) सहज मिळेल. यासाठी तुम्हाला वेगळे कार्ड बनवावे लागणार नाही. यासोबतच तुम्हाला तुमच्या जुन्या शिधापत्रिकेवरच सुविधेचा लाभ मिळेल.

“शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी कंपन्यांची, अन्यथा थेट होणार कारवाई;” कृषिमंत्र्यांच्या सूचना

डिसेंबरपर्यंत मोफत रेशन मिळणार
केंद्र सरकारकडून डिसेंबरपर्यंत मोफत रेशन सुविधा (Agri News) उपलब्ध करून देण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार पात्र लाभार्थ्यांना महिन्यातून दोनदा रेशन कोटा देत आहे, ज्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांना फायदा होत आहे. एकदा रेशनचे (Ration Card Update) वितरण निश्चित किंमतीवर केले जाते. तर दुसऱ्यांदा गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत वाटप करण्यात आले आहे.

वाचा: शेतकऱ्यांची चिंता वाढणार! रब्बी हंगामातही खतांची टंचाई; थेट दरावर होणार परिणाम, जाणून घ्या…

मोफत रेशनच्या पुरवठ्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही
मोफत रेशनच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून सरकार टेक होम रेशन प्रणाली ऑनलाइन करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या रेशनमध्ये कोणतीही अडवणूक करता येणार नाही. THR प्रणाली सुरू केल्यानंतर, प्लांटपासून रेशन वितरणापर्यंतच्या सर्व कामांचा मागोवा घेता येईल आणि त्याचे निरीक्षणही करता येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for ration card holders! Center’s big decision on free ration; New rule applicable across the country

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button