ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Rain Forecast| यलो अलर्ट! उन्हाच्या चटक्यात बसणार अवकाळी पावसाचा फटका, ‘या’ जिल्ह्यांवर संकट

Rain Forecast| वातावरण बदललेलं आहे. त्याचे परिणाम सर्व जगभरात दिसत आहेतच. एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव येत आहे. कधी गारठा, प्रचंड ऊन आणि उकाडा तर कधी पाऊस. यामुळे सबंध मानवाजात त्रस्त आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग(Global warming). आणि ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत आहे माणूस. हे खूप काळजी करण्यासारखं आहे. हवामान तज्ञ सांगून दमले तरी माणूस काही ऐकत नाही. असो. हवामान खात्याकडून एक इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कडाक्याचं ऊन असताना, अशातच अवकाळी पावसाचे संकेत आहेत. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. या पावसाचा फटका शेतीशिवाय आणि शेतकऱ्यांशिवाय कुणाला फारसा बसत नाही. त्यामुळं हे खूपच काळजी करण्यासारखं आहे.

वाचा: बाप रे! मगरीच्या तोंडात जाऊनही माणूस जिवंत, तुम्हीच पाहा विश्वास न बसणारा व्हिडिओ

काय आहे अंदाज

हवामान खात्याकडून नुकताच एक इशारा देण्यात आला होता. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांनी राज्यभरातील जिल्ह्यांना चटका बसेल, असा तो इशारा. हा इशारा देण्याचा अवकाश की हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे. यलो अलर्ट! म्हणजे राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा इशारा. राज्यात 7 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यामुं शेतकऱ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे आणि अस्मानी संकटासमोर कुणाचं काय चालणार? त्यामुळं निसर्गासमोर प्रार्थना करण्यावाचून काहीच पर्याय नाही. नसतोच.

या जिल्ह्यांना बसणार फटका

7 एप्रिल पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली. यानुसार 4 एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे तर 5 एप्रिल रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

वाचाही’ अट रद्द करा अन्यथा… कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, अनुदानाच्या लाभात येताहेत अडचणी

यलो अलर्ट म्हणजे काय?

यलो अलर्ट (Yellow Alert) म्हणजे 7.5 ते 15 मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता. हा अलर्ट लोकांना हवामानाबद्दल सावध राहण्याकरता दिला जातो. यामध्ये अजून रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि ग्रीन अलर्ट यांचा समावेश होतो. हवामानाच्या तीव्रतेनुसार हे अलट जारी करण्यात येतात.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button