ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Agriculture News| धक्कादायक, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक, आधिकारी आणि व्याऱ्यांचे संगनमत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप

Agriculture News| यावर्षी पावसाने साथ दिल्याने रब्बी हंगामात हरभऱ्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालं आहे. या उत्पादनाला योग्य दर मिळावा म्हणून शासनाने नाफेड (NAFED) अंतर्गत हरभरा खरेदी केंद्रं सुरू केली आहेत. मात्र बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील नाफेडचे अधिकारी आणि खाजगी व्यापारी यांनी संगनमताने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केल्याची घटना समोर आली आहे. यातून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे.

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

Agriculture News| शेतकऱ्यांची लूट हा काही नवीन प्रकार नाही. खाजगी व्यापारी तर शेतकऱ्यांची बेधुंद लूट करत असतात. यावर उपाय म्हणून सरकारने ठिकठिकाणी नाफेड केंद्रांची स्थापना केली आहे. असेच एक केंद्र बुलढाण्यातही आहे. मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी न करता शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर व्यापाऱ्यांचा हरभरा खरेदी केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामध्ये खाजगी व्यापारी व नाफेडचे अधिकारी यांचं संगनमत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

काय आहे आरोप

नाफेडच्या माध्यमातून हरभऱ्याला 5 हजार 335 रुपयांचा हमीभाव जाहीर झाला आहे. त्यानुसार हरभऱ्याची खरेदी देखील सुरू झाली आहे. यासाठी बुलढाणा जिल्ह्यात एकूण 24 हरभरा खरेदी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. हरभरा कमी दर्जाचा आहे असं सांगून नाफेडचे अधिकारी शेतकऱ्यांकडून हरभरा कमी दरात विकत घेत आहेत, यामुळे शेतकरी नाफेडच्या केंद्रावर हरभरा न विकता तो व्यापाऱ्यांना विकत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी विकत घेतलेला शेतकऱ्यांचा तोच हरभरा त्यांच्या सातबारावर नाफेडचे अधिकारी खरेदी करीत आहेत. हा प्रकार बुलढाण्यातील आदिवासी भाग असलेल्या संग्रामपूर, जळगाव जामोद आणि शेगाव या तालुक्यात घडलेला आहे.

हरभऱ्याची विक्रमी लागवड

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

यंदा सरासरीच्या 10 लाख मॅट्रिक टन अधिक हरभरा उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात यावर्षी तब्बल 29 लाख वीस हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड झाली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटू नये म्हणून राज्यात एकूण 552 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून 88 लाख मेट्रिक टन हरभरा खरेदीचं उद्दिष्ट सरकारने डोळ्यांपुढं ठेवलं आहे.

शेतकऱ्यांमागील लूट कधी थांबणार

बुलढाण्यात घडलेल्या घटनांसारखे प्रकार राज्यात घडणार असतील तर शेतकऱ्यांची लूट कशी थांबणार असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यावे व संबंधितांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी अनेक स्तरांतून केली जात आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button