ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Ragi Planting | नाचणी सुधारित पद्धतीने तीनही हंगामात करा आणि मिळवा भरघोस उत्पादन

शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असणारी नाचणी सुधारित पद्धतीने तीनही हंगामात करा.

Ragi Planting | राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी लागवड तीनही हंगामात केली जाते. खरीप, रब्बी, उन्हाळी या तिन्ही हंगामात बी पेरणीचा कालावधी:
खरीप: मे ते जून
पुनर्लागवडीचा कालावधी: जून ते जुलै
रब्बी: सप्टेंबर ते ऑक्टोबर
पुनर्लागवडीचा कालावधी: ऑक्टोबर ते नोव्हेंबर
उन्हाळी: जानेवारी ते फेब्रवारी
पुनर्लागवडीचा कालावधी: फेब्रुवारी ते मार्च

नाचणी पीक काळया, रेताड लाल जमिनीत तसेच हलक्या व डोंगर उताराच्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येते. या पिकासाठी हलक्या ते मध्यम प्रतीची अधिक सेंद्रिय पदार्थ असणारी व ५.५ ते ८.५ सामू असणारी योग्य निचरायुक्त सुपीक जमीन नाचणी पिकास योग्य असते.

वाचा: भात लागवडीसाठी करा यंत्राचा वापर! आर्थिक बचत तर होईलच पण यंत्रासाठी सरकारही देतंय अनुदान

नाचणी पिकाची (Ragi seeds) बियाणे आणि जाती:
३-४ किलो प्रति हेक्टरी.
गोदावरी, बी – ११, पीईएस-११० इंडाफ ८, दापोली – १, व्ही एल – १४९, जीपीयू – २६, २८,पी आर-२०२,), इ-३१ (निमगरवा) आणि ए-१६ (गरवा). नाचणीच्या तांबूस व पांढऱ्या प्रकारांचे दाणे जास्त पौष्टिक असतात.

पूर्वमशागत/ Pre-cultivation:
एक खोल नांगरट, २-३ कुळवाच्या पाळ्या देवून शेणखत (manure) कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून घ्यावे. जमिनीतील धसकटे, पालापाचोळा गोळा करून जाळून टाकावा जेणे करून खोडकिडीचा बंदोबस्त करता येतो.

लागवड पद्धत/ Cultivation method:
पुनर्लागवड पद्धतीने पेरणीसाठी १ ते १.५ किलो बियाणे आणि 2 ते 3 किलो युरिया प्रति एकर वापरावे. सुरुवातीला बियाणे पेरणीसाठी जमिनीच्या उतारानुसार गादी वाफे तयार करावेत. बियाणे जूनच्या मध्यावर गादीवाफ्यावर सरळ रेषेत पेरावे. १ ते २ सें.मी. खोल पेरून मातीने झाकून द्यावे. बियाणे पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी ५०० ग्रॅम युरीया  प्रती गुंठा या प्रमाणे खताचा हप्ता द्यावा. २५ ते ३० दिवसांची रोप निवडावीत. नाचणीची रोपे ओळीत अंगठ्याच्या साहाय्याने दाबून लावली म्हणजे झाडांची वाढ समान होते व आंतरमशागत करण्यासाठी सोपे  जाते.

आंतरमशागत/ Distance Cultivation:
एक खुरपणी आणि दोन कोळपणी किंवा आयसोप्रोट्युरॉन ५० टक्के या तणनाशकाची (Herbicide)प्रति हेक्टरी ७५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून पीक व तणे उगवणीपूर्वी फवारावे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ कारणांमुळे गव्हाच्या किंमतीत होणार वाढ?

पीक संरक्षण/ Pickup Protection:
१. लष्करी अळी व पाने खाणारी अळी : खरीपात ३० ते ८० टक्के नुकसान. गवताळ-डोंगरी भागात जास्त प्रादुर्भाव. या आळीच्या बंदोबस्तासाठी शेतातील/बांधावरील गवत काढून टाकावे.
२. मावा-तुडतुडे : प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळात जास्त रस शोषून घेतात. कर्बग्रहण मंदावते.

काढणी/ Harvesting:
पीक पक्क होताच लवकर पीकाची काढणी करावी.  पीकाची काढणी बोंडे खुडून लवकर करावी कारण काढणीस उशीर झाल्यास बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. बोंडे चांगली वाळल्यानंतर बडवून मळणी करून उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी साठवण करावी. पुढील वर्षाच्या बियाणासाठी चांगली भरलेली टपोऱ्या दाण्याची कीड व रोग विरहीत बोंडे निवडून मळणी करून साठवण करावी.
उत्पादन:
नाचणी पिकाची उत्पादन हेक्टरी 20 ते 25 क्विंटल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button