ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

प्रधानमंत्री कुसुम योजना ठरेल शेतकऱ्याच्या उन्नती चा मार्ग ! जाणून घ्या कसा घेता येईल या योजनेचा लाभ..

प्रधानमंत्री कुसुम योजना :
शेतकऱ्यांच्या हितासाठी आज-काल केंद्र सरकार विविध प्रकाराचे योजनांना मंजुरी देत आहे. शेतकरी बऱ्यापैकी आपल्या शेतीसाठी निसर्गाप्रती अवलंबून राहत असतो मधील पाणीपुरवठा असो किंवा वीज पुरवठा असो किंवा हवामान. निसर्ग राजा च्या मर्जीनुसार शेतकऱ्याला वागावं लागतं व त्यामुळे त्याला खूपच अडचणी येतात सर्वात मोठी अडचण म्हणजे काय तर पाण्याची कमतरता. याच अडचणीला मात देण्यासाठी केंद्रीय सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजना राबवली आहे.


प्रधानमंत्री कुसुम योजना चा लाभ कसा घ्यावा :
• शेतकऱ्याला आपल्या शेतात बोरवेल ,नदी , पान तळे, किंवा पाण्याचे स्त्रोत शेतामध्ये असणे आवश्यक आहे.
• शेतकऱ्यांना आपल्या जमिनीनुसार सौर पंप मिळतात.
• 2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 HP DC,5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP DC,5 एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
• शेतकऱ्यांना यात २.५ एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्याचे ३ HP , ५ एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांची ५ HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्याच्या ७.५ HP डीसी पंप स्थापित करण्यात येणार आहेत .


प्रधानमंत्री कुसुम योजना च्या काही महत्त्वाच्या बाबी :
प्रधानमंत्री कुसुम योजना
ही २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात अरुण जेटली तर्फे घोषणा केली गेली होती. या योजनेची सुरुवात २०२१ साली झाली. सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचावी व त्यांनी त्याचा लाभ घ्यावा हा योजनेचा सर्वात मोठा उद्देश आहे. या योजनेखाली शेतकऱ्यांना २० हजार सौर्य ऊर्जा पंप देण्यात आले आहेत पण तरीसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला नाही.

शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा :
• २४ तास लाइट राहील,ज्यामुळे शेतकर्यांना शेताला पुरेपूर पाणी देता येईल.
• लाईट बिल वाचेल व आर्थिक लाभ होईल , त्याच पैशातून शेतकऱ्याला त्याच्या इतर शेत गरज पूर्ण करता येतील .
• कुसुम योजना २०२१ नुसार शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल व शेतकरी समृद्ध होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button