ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Pradhan Mantri Jan Dhan Yojana | पंतप्रधान जनधन योजनेच्या बंद खात्यांत कोट्यवधींचा निधी! हे पैसे परत मिळवण्याचे मार्ग

Pradhan Mantri Jan Dhan Yojana | Crores of funds in closed accounts of Prime Minister Jan Dhan Yojana! Ways to get this money back

Pradhan Mantri Jan Dhan Yojana | २०१४ मध्ये सुरू झालेल्या पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत आतापर्यंत ५१ कोटी लोकांनी बँक खाती उघडले आहेत. पण दुर्दैवाने, त्यातील १० कोटींहून अधिक खाती निष्क्रिय झाल्या आहेत. या निष्क्रिय खात्यांमध्ये तब्बल १२ हजार कोटींहून अधिक रक्कम जमा असूनही ती धुळ खात आहे. (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) या पैशांवर दावा करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही, त्यामुळे हा निधी बँकांमध्येच रेंगाळत आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या निष्क्रिय खात्यांपैकी जवळपासे ५ कोटीहून अधिक खाती महिलांच्या आहेत. अनेक महिने या खात्यांवर कोणताही व्यवहार न झाल्यामुळे बँकांनी नियमानुसार त्या बंद केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार न झाल्यास खाते निष्क्रिय मानले जाते.

वाचा : Bank Withdraws | बँकेने अकारण तुमच्या खात्यातून पैसे काढले तर काय करावे? जाणून घ्या सविस्तर …

जनधन योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडणे हा होता. या योजनेअंतर्गत अवघ्या १ रुपयात खाते उघडता येते आणि किमान शिल्लक ठेवणीवर कोणतेही बंधन नाही. सरकारी योजनांचे लाभ थेट या खात्यात जमा करून गरिबांना आर्थिक सहाय्य पोहोचवण्यामध्ये या खात्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

मात्र, बंद खात्यांचे प्रमाण वाढणे चिंताजनक आहे. बँका या प्रमाणाला कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि खातेधारकांशी विविध माध्यमातून संपर्क साधून खाती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

जर तुमचे जनधन खाते निष्क्रिय झाले असेल तर तुम्ही ते पुन्हा सुरू करू शकता:

  • तुमच्या खात्याच्या शाखेत जाऊन अर्ज द्या.
  • तुमचा आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा इतर ओळखपत्र सादर करा.
  • केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

या प्रक्रियेनंतर तुमचे खाते पुन्हा सुरू होईल आणि तुम्ही पुन्हा त्याचा वापर करू शकता.

Web Title : Pradhan Mantri Jan Dhan Yojana | Crores of funds in closed accounts of Prime Minister Jan Dhan Yojana! Ways to get this money back

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button