ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ तारखेला होणारं 12 वा हप्ता खात्यात जमा, जाणून घ्या तारीख

PM Kisan | करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक (Financial) मदत दिली जाते. चार महिन्यांत येणाऱ्या 2 हजार रुपयांच्या रकमेतून शेतकऱ्यांना (Agriculture) मोठा फायदा होतो. आतापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) 11 हप्ते शेतकऱ्यांना पाठवले आहेत. तर शेतकरी 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता याबाबतचं मोठी माहिती समोर आली आहे.

वाचा: 1 सप्टेंबरपासून होणारं ‘हे’ मोठे आर्थिक बदल; थेट होणारं तुमच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या सविस्तर

31 ऑगस्टपर्यंत केवायसी
सरकारने दिलेली ई-केवायसीची अंतिम मुदत देखील संपली आहे. 31 ऑगस्टपर्यंत मुदत देऊन देखील अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी होऊ शकली नाही. त्यामुळे हे लाभार्थी या 12 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. तसेच या केवायसी संदर्भात मुदत वाढीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे ही एक चिंतेची बाब आहे.

‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 12 वा हप्ता
पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता फक्त आधारशी जोडलेल्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. 5 सप्टेंबरपर्यंत योजनेशी संबंधित रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात. या वेळी सरकारचे मुख्य लक्ष अपात्र लाभार्थ्यांना दिले जाणारे लाभ थांबवणे आणि पैसे वसूल करणे हा आहे. याबाबत प्रधान सचिव डॉ. अरुण कुमार मेहता यांनी माहिती दिली आहे.

वाचा: कापूस उत्पादकांसाठी खुशखबर! कापसाला मुहूर्तालाच मिळाला प्रति क्विंटल ‘इतका’ दर

काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना?
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देण्याची तरतूद आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी दिली जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important news for farmers! 12th installment to be deposited in the account on date know the date

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button