ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Artificial intelligence| कमालच! जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्या गरीब, एआयचे फोटो पाहून व्हाल थक्क..

Artificial Intelligence| जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असा प्रश्न कुणी विचारल्यास पटकन जिभेवर येणारी नावं म्हणजे बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, एलॉन मस्क इत्यादी. आणि भारतातील? मुकेश अंबानी वगैरे. मात्र या व्यक्ती आता गरीब झाल्या आहेत. हो आणि ही कमाल आहे एआयची (Artificial intelligence). प्रत्यक्षात या व्यक्ती जरी श्रीमंत असल्या तरी एआयचा वापर करून या व्यक्ती गरीब झाल्यास कशा दिसतील याचे फोटोज् तयार करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्प पासून ते मुकेश अंबानीं पर्यंत प्रत्येक जण गरिबांच्या कपड्यात असून झोपडपट्टी सारख्या भागात उभे असल्याचं दिसून येत आहे. एआय आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. यामुळे कित्येक क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झाली आहे. त्यामुळे अगदी अशक्यप्राय गोष्टी शक्य होताना दिसत आहेत.

कुणी केली ही कमाल

डिजिटल क्रिएटर गोकुळ पिल्लई यांनी हे फोटो तयार केले आहेत. इन्स्टाग्रामवर हे फोटो त्यांनी शेयर केले आहेत. जगातील काही श्रीमंत व्यक्तींचे गरीब अवस्थेतील फोटो AI च्या ‘मिडजॉर्नी’ द्वारे तयार केले आहेत. फोटो पोस्ट करताना पिल्लई यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय ‘स्लमडॉग मिलियनेअर्स’. आणि यामध्ये कुणाचा समावेश करायचा राहिलाय का असाही प्रश्न त्यांनी नेटिझन्सना विचारला आहे. सध्या इन्स्टाग्रामवर हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. युजर्सकडूनही यावर चित्रविचित्र कमेंट्स केल्या जात आहेत. काहींना हे फोटो खूप आवडलेत, तर काही जण खिल्ली उडवताना दिसत आहेत. या पोस्टला सोशल मीडियावर आत्तापर्यंत १० हजारहून अधिक लाईक्स आणि असंख्य कमेंट्स आल्या आहेत.

कुणाचे आहेत फोटो

या फोटोंमध्ये बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प, मार्क झुकेरबर्ग, जेफ बेझोस, एलॉन मस्क, वॉरन बफे आणि भारतातील मुकेश अंबानी यांसारख्या जगातील श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण अतिशय मळलेल्या कपड्यात या फोटोत दिसून येत आहेत. तसेच झोपडपट्टी सारख्या परिसरातील हे फोटो आहेत. आणखी कोण राहिलय का असा प्रश्न या फोटोंचे निर्माते गोकुळ पिल्लई यांनी विचारला आहे. हे फोटो पाहून आपल्याला अजिबात असं वाटत नाही की, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं बनवले आहेत, कारण हे फोटो अगदी हुबेहूब खरेखुरे असल्याचे भासतात.

यापूर्वीही झालीये अशी कमाल

यापूर्वीही ज्यो जॉन मुल्लूर नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने असे फोटो तयार केले आहेत. मुल्लूर यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा आणि एल्विस प्रेस्ली यांच्यासह प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे सेल्फी घेतानाचे फोटो पोस्ट केले होते. यासाठी AI सॉफ्टवेअर मिडजर्नी आणि फोटोशॉपचा वापर केला होता. हे फोटोही इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले होते.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button