ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Animal Care| काळजी घ्या, जनावरांना शिळे अन्न घातल्यास होऊ शकतो ‘हा’ आजार, मृत्यूचीही असते भीती

Animal Care| अन्न हे पूर्णब्रह्म आहे. यामुळे अन्न वाया जाऊ नये याची काळजी आपण सतत घेत असतो. पण आपण आहोत सणांच्या आणि उत्सवांच्या देशातील नागरिक. या सण उत्सव किंवा काही कार्यक्रमानिमित्त भोजनसुख घेणं ही आपली परंपरा आहे. कुणाला कमी पडू नये यासाठी जरा जास्तीचंच जेवण आपण बनवत असतो. त्यामुळे ते शिल्लक राहतंच. पण वर सांगितल्याप्रमाणे अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि ते वाया जाऊ नये याच्या काळजीपोटी शिळ्या अन्नाची आपण योग्य विल्हेवाट लावत असतो. योग्य विल्हेवाट म्हणजे काय तर ते शिळे अन्न जनावरांना खाऊ घालणं. हे शिळ झालेलं पूर्णब्रह्म अन्न जनावरांचा मात्र प्राण घेऊ शकतं. हो, हे खरं आहे. शिळे अन्न खाल्ल्यामुळे जनावरांना ‘चयापचय’ (Animal Acidosis) हा आजार होऊ शकतो आणि हा आजार जीवही घेऊ शकतो.

वाचा: बाप रे! मगरीच्या तोंडात जाऊनही माणूस जिवंत, तुम्हीच पाहा विश्वास न बसणारा व्हिडिओ

का होतो आजार

हा आजार मुख्यत्वे रवंथ करणाऱ्या जनावरांना होतो. शिळ्या अन्नात कर्बोदकांचे (Carbohydrates) प्रमाण जास्त असते. असे पदार्थ शिळे झाले की त्यात बुरशी वाढते आणि हे असं अन्न खाल्ल्यास जनावरांच्या पोटातील जीवाणू अधिक प्रमाणात आम्ल (Acid) तयार करतात. जनावरांच्या मुख्य पोटाचा सामू (PH) 6.5 ते 7 च्या दरम्यान असतो. या तयार झालेल्या आधिकच्या आम्लामुळे हा सामू 5.5 पेक्षा खाली येतो. यामुळे चयापयचय हा आजार होतो.

ही आहेत लक्षणे

तुमच्या जनावराला चयापचय झाला आहे हे कसं ओळखाल? तर या आजाराची जनावरात काही लक्षणं दिसून येतात. सुरुवातीला जनावरांचं चाऱ्याचं आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं. यामुळे दूधही घटतं आणि फॅटही कमी होते. यानंतर जनावर लंगडू लागतं. शेण पातळ होतं. सोबतच शेणात बुडबुडे आणि फेसही दिसू लागतो. यानंतर जनावरांचा रवंथ कमी होतो.

मृत्यूची भीती

अशी लक्षणे जनावरात दिसू लागल्यास लवकरात लवकर उपचार घेणं गरजेचं आहे. अत्यंत घातक असलेला हा आजार रोगनिदानासाठी तितकाच अवघड आहे. यामुळे चयापचयाचा आजार वाढून जनावराचा मृत्यूही ओढवू शकतो.

वाचाही’ अट रद्द करा अन्यथा… कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, अनुदानाच्या लाभात येताहेत अडचणी

उपलब्ध उपचार

या आजारावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार घेता येतात. गरजेनुसार सलाईन व इंजेक्शन देता येतं. तसेच आजाराचे प्रमाण तीव्र असल्यास शस्त्रक्रियाही करावी लागू शकते. शस्त्रक्रिया करून पोटातील सर्व अन्न बाहेर काढलं जातं.

यामुळे इथून पुढं अन्न हे पूर्णब्रह्म असलं तरी शिळं अन्न आपल्या जनावरांना घालताना काळजी घ्या.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button