ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Onion Subsidy | कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांद्याला प्रतिक्विंटल मिळणार अनुदान, जाणून घ्या 200 की 500 रुपये?

Onion Subsidy | सध्या राज्यभरात कांद्याच्या दराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांद्याला कवडीचाही दर मिळत नसल्यामुळे कांदा (Onion Subsidy) बाजारात विकायला न्यावा की नाही? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. कारण बाजारात कांदा विक्रीस नेल्यानंतर कांद्याची पट्टी हाती येत नाही. मात्र, शेतकऱ्यांना (Agriculture) आपल्या खिशातीलच पैसे कांद्यासाठी मोजावे लागत आहेत. म्हणून राज्यातील कित्येक शेतकरी कांद्यावर (Onion Subsidy) थेट रोटर फिरवत आहेत. याच कांदा प्रकरणी आता राज्य सरकार जागृत झालं आहे आणि कांदा उत्पादकांना अनुदान देण्याच्या चर्चा सुरू आहेत.

वाचा: अदानी एंटरप्रायझेससह ‘या’ 5 शेअर्सने या आठवड्यात केली जबरदस्त कमाई, 5 दिवसात 43% पर्यंत दिला परतावा

कांद्याला मिळणार अनुदान
सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Agricultural Information) अडचणीत आहेत. सतत कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे याबाबत चर्चा सुरू आहेत. राज्य सरकार कांदा उत्पादकांना आर्थिक (Financial) सहाय्य देण्यासाठी अनुदान देण्याबाबत चर्चा करत आहे. याचा अहवाल पुढील आठवड्यात येऊ शकतो.

किती मिळणार अनुदान?
आता शेतकऱ्यांना कांद्यासाठी किती अनुदान मिळू शकते ही गोष्ट महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रतिक्विंटल 200 ते 500 रुपये अनुदान देण्याबाबत चर्चा सुरू आहेत. कारण कांदा उत्पादक शेतकरी सध्या दरामुळे संकटात आहेत. याच कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून एक समिती गठीत करण्यात आली आहे. याच समितीचा अहवाल पुढच्या आठवड्यात येऊ शकतो.

वाचा: फक्त 74 रुपयांच्या शेअरने ‘बिग बीं’ना बनवले लक्षाधीश! 5 वर्षांत मिळाला 5 पट परतावा

अद्यापही नाफेडकडून खरेदी सुरू नाहीच
विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये कांदा प्रश्नावरुन विरोधक सध्या आक्रमक झाले आहेत. त्याचवेळी नाफेडकडून कांदा खरेदी सुरू नाही, हेही प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आलीय, असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही नाफेडकडून कांदा खरेदी करण्यात आली नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for onion growers! Onion will get subsidy per quintal, know 200 or 500 rupees?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button