ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतीला दिवसा पाणी देणं शक्य, राज्य सरकारची ‘ही’ योजना पुन्हा सुरू

शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Chief Minister Solar Agriculture Pump Yojana) पुन्हा नव्याने सुरू होणार आहे.

Yojana | याचबरोबर कुसुम सोलर पंप योजनेच्या कामाला एक गती मिळणार आहे. राज्यात 2018 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी नावाची योजना (Agriculture Scheme) सुरू करण्यासाठी घोषणा करण्यात आलेली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी (land) भाड्याने घेऊन त्या जमिनीवरती सोलर प्रोजेक्ट उभा करून शेतकऱ्यांना शेतीसाठी (Agriculture) दिवसा 8 तास वीज मिळावी याची सुरुवात करण्यात आली होती.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
डिसेंबर 2020 मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. योजनेंतर्गत बरेच प्रोजेक्ट देखील उभा राहिलेले आहेत. राज्यामध्ये शेतकऱ्यांना 8 तास दिवसा विजेचा (electricity) पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला एक लाखाचा टप्पा दिला होता. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला सोलर पंप दिले जात आहे. परंतु आपण एक लाख सोलर पंप देण्याची घोषणा केल्यानंतर ज्या पद्धतीने योजनेची अंमलबजावणी होणे गरजेचे होते त्या पद्धतीने योजनेची अंमलबजावणी झाली नाही. एक वर्ष पूर्ण पणे वाया गेले.

वाचा: Yojana | आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या महत्वाच्या योजना सुरु, ‘या’ प्रवर्गातील तरुणांना मिळणार उद्योगासाठी आर्थिक मदत

योजनेकडे शेतकऱ्यांचा कल
साधारणपणे साडेचार हजार पंप या योजनेच्या अंतर्गत इन्स्टॉल करण्यात आलेले. साधारणपणे 35000 शेतकऱ्यांना पेमेंटच्या ऑप्शन गेलेले आहेत. या 50 हजार 275 पंपाच्या कोट्यापैकी जवळपास 15000 शेतकऱ्याला अद्याप पेमेंटचे ऑप्शन देणे बाकी आहे. अशाप्रकारे ही एक अंमलबजावणी सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सोलर पंप योजनाकडे कल आहे. याच पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महाऊर्जा सोबत महावितरणचे अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button