ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Distribution Livestock To Farmers | मोठी बातमी, OBC व OPEN गटातील शेतकऱ्यांना 90 % सबसिडीवर मिळणार गाई – शेळ्या…

Distribution Of Cows And Goats To Farmers | पशुपालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मागासवर्गीय व सर्वसामान्य पशुपालकांसाठी पशुसंवर्धन मंत्र्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत पशुसंवर्धन मंत्र्यांच्या हस्ते 950 गाय गट व 1360 शेळी गट वाटप करण्यात आला. या निर्णयामुळे पशुपालकांचा रोजगार बळकट होणार आहे.

वाचा कौतुकास्पद; या शेतकऱ्याने केले जुगाड, पडीक जमीन तासाभरात झाली पेरणीयोग्य…

या गाई व बकऱ्यांचे वाटप –

या मोहिमेनुसार 10 लिटर दूध देणाऱ्या, गीर, साहिवाल, राठी, महेसाणा, सुरती इ. जातीच्या गाईंचे वाटप केले जाणार. तसेच शेळी गटांमध्ये उस्मानाबादी, संगमनेरी, जमनापुरी बकऱ्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. विक्री करण्यात येणाऱ्या गाई व बकऱ्यांचे लसीकरण केले आहे.

तसेच पुरवठा करण्यात येणाऱ्या गाई किंवा बकऱ्या यांचा विमा काढला आहे. 30 दिवसांपर्यंत जनावरे दगावल्यास नवीन देण्यात येईल. राज्यात OBC आणि OPEN मधील लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेने जिल्ह्याच्या विकासासाठी 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडलेला आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ रोजगार मिळण्यासाठी आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button