ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Madha Talathi | आणखी किती शेतकऱ्यांना लुबडणार? 10 हजारांची लाच घेताना तलाठ्याला पकडलं रंगेहाथ, थेट राहत्या घरीच एससीबीची कारवाई

Madha Talathi | शेतकऱ्यांची अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून फसवणूक केली जाते. शेतकरी काही कागदपत्रे काढावयास गेल्यावर अशिक्षित असल्यामुळे त्यांची अनेकदा फसवणूक केली जाते. तलाठ्यांच्या (Madha Talathi) माध्यमातून तर शेतकऱ्यांची वेळोवेळी फसवणूक केली जाते. शेतकऱ्यांकडून लाच घेतली जाते, परंतु या लाचखोरीचा परिणाम सदर गुन्हेगारास भोगाव लागतो. अनेक प्रकरणे उघडकीस आली आहे. नुकताच आता असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तलाठ्याने (Madha Talathi) शेतकऱ्याकडून तब्बल 10 हजारांची लाच घेतली आहे.

लाच घेतानाच पकडले रंगेहाथ
तलाठ्यांकडून या लाच लुचपतीचा प्रकार अनेकदा करण्यात येतो. शेतकऱ्यांचा फायदा घेऊन तलाठी हे लाजिरवाने काम करतात. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यामध्ये घडला आहे. सोलापूरमधील तालुक्यातील माढा तालुक्यातील दहीवली गावात एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडला आहे. दहिवली गावचे तलाठी सहदेव शिवाजी काळे (वय 54 वर्ष) यांनी आपल्या राहत्या घरी शेतकऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच घेतली. या तलाठ्याला हे लाजिरवाणे कृत्य करतानाच रंगेहात पकडले.

थेट बायको आणि पोरांसमोरच केली कारवाई
शेतकऱ्याकडून रहत्या घरी 10 हजारांची लाच घेताना या तलाठ्याला रांगेत पडकल आणि थेट त्यांच्यावर बायको-पोरांसमोरच एसीबीने कारवाई केली आहे. ही लज्जास्पद बाब यापूर्वी अनेकदा घडली आहे. शेतकरी सातबारा, उत्पन्न दाखला किंवा जमिनीची कोणतीही कागदपत्रे काढायला गेल्यास शेतकऱ्यांसोबत असे प्रकार घडतात. पण शेतकऱ्यांनी हे प्रकार उघडकीस आणणे गरजेचे आहे.

किती रुपयांची केली मागणी?
शेत जमिनीचे खातेफोड करण्यासाठी शेतकरी तलाठ्याकडे गेला होता. त्याचवेळी शेतकऱ्याला या तलाठ्याने 35 हजारांची मागणी केली. तुझ माझं करता करता शेवटी हा व्यवहार 30 हजारांवर आला. याचाच पहिला हप्ता सोमवारी देण्यासाठी शेतकरी तलाठ्याकडे गेला असता त्याला रंगेहाथ पकडले. थेट राहत्या घरीच बायको आणि मुलांसमोर एससीबीने कारवाई केली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: How many more farmers will be robbed? Talatha caught red-handed while accepting a bribe of 10 thousand, SCB action directly at the residence

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button