ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्लाहवामान

Maharashtra Weather Update | राज्यात गारांसह अतिवृष्टीचा इशारा! ‘या’ ठिकाणी दिला ऑरेंज अलर्ट, शेतकऱ्यांचही मोठं नुकसान

Maharashtra Weather Update | राज्यात हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळत आहे. पण शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. राज्यात या अवकाळी पावसाचं (Maharashtra Weather Update) वातावरण आणखी पुढचे तीन दिवस राहणार आहे. त्याचमुळे राज्यावर अस्मानी संकट ओढवलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात हवामान विभागाकडून (Maharashtra Weather Update) कोठे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ते जाणून घेऊयात.

आतापर्यंत कुठे पावसाने हजेरी लावली ते जाणून घेऊयात. तर उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये काल (14 मार्च) पावसाने विजांच्या गडगडाटासह हजेरी लावली आहे. आज देखील हवामान विभागाने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे सांगितले आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची देखील धांदल उडाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचं तर पाणी पळालं आहे.

वाचा: आता शेतकऱ्यांची फसवणुक थांबणार! ‘या’ सॉफ्टवेअरमुळे बनावट अंगठ्यांना बसणार आळा

‘या’ ठिकाणी दिला ऑरेंज अलर्ट
आज हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह, जोरदार गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे हवामन विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वाचाYojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेळीपालनासाठी 100 टक्के अनुदान, ‘या’ दोन योजनांना मंजुरी

शेतकऱ्यांनी रहावे सतर्क
राज्यात हवामान बदलामुळे आणि पावसामुळे उकाड्यात देखील वाढ झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट होत आहे. तर आता गारांचा पाऊस होणार म्हणल्यावर शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर काढणीला आलेली पिके काढून घ्यावीत. तसेच शेतमाल देखील व्यवस्थित साठवून ठेवावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button