ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Health Tips | रात्री अपरात्री भूक लागणं आहे ‘या’ आजाराचं लक्षण, हलक्यात घेणं पडू शकत महागात

Health Tips | आजकाल धावपळीच्या युगात आपल्या जेवणाच्या सवयी खूपच बदलून गेल्या आहेत. कामाला प्राधान्य दिल्याने जेवण, व्यायाम याकडे सतत दुर्लक्ष होते. दरम्यान खाण्याच्या वेळा सुद्धा अजिबातच ठरलेल्या नसतात. याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात.

खूपदा आपल्याला रात्री झोपेतून उठून किंवा रात्री उशिरा काम करून जेवण करण्याची सवय असते. याला लेट नाईट क्रेव्हिंग ( Night Craving) असेही म्हणतात. परंतु, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे आपल्याला विविध आजार होऊ शकतात.

दिवसा भूक ( Hunger) लागणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. पण रात्री उशिरा तुम्हाला भूक लागत असेल तर हे चांगल्या आरोग्याचे लक्षण नाही. यामुळे तुम्हाला अस्वस्थ आहाराच्या तक्रारी जाणवू लागतील. तसेच मधुमेह होण्याचा धोका देखील वाढेल.

दिल्लीमधील एका डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला रात्रीची वारंवार भूक लागत असेल किंवा तुम्ही रात्रीचे उशिरा जेवण करत असाल तर ते मधुमेहाचे लक्षण आहे. एवढेच नाही तर यामुळे हृदयरोग ( Heart Disease) आणि लठ्ठपणा (Obesity)देखील वाढू शकतो.

खरंतर, रात्रीच्या वेळी भूक निर्माण करणाऱ्या पदार्थांमध्ये कॅलरी, साखर व चरबीचे प्रमाण जास्त असते. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा व हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे रात्री उशिरा जेवण केल्याने पचनप्रक्रिया ( Digetion) बिघडते. तसेच तुम्हाला जेवण वगळण्याची सुद्धा सवय लागते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button