ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Soyabean | जागतिक सोयाबीन उत्पादन अनुसार जाणून घ्या सोयाबीन चे भाव वाडणार की कमी होणार..

Soyabean | युएसडीएनं (USDA) काय अंदाज जाहीर केला –

अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं यंदा जागतिक सोयाबीन उत्पादनात ( Soybean Production) वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे .यात ब्राझील , अर्जेंटीनातील , पेरुग्वे व चीनमध्ये उत्पादन(Agricultural Information) वाढेल तर अमेरिकेमध्ये आणि भारतात उत्पादन घटेल असे जाहीर केले आहे .पण मागील हंगामातही युएसडीएनं सुरुवातीला या देशांमधील सोयाबीन उत्पादन वाढेल, असे म्हटले होते मात्र उत्पादन घटलेलं दिसले.

युएसडीए प्रमाणे किती टनांनी वाढ आणि घट होण्याची शक्यता –

अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन ३५३ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय. यात ब्राझीलमधील उत्पादन २५० लाख टनानं वाढणार आहे. तर अर्जेंटीनातील उत्पादनात (Agricultural Information)यंदा ७० लाख टनांची भर पडेल. पेरुग्वे देशात ५८ लाख टनांनी तर चीनमध्ये २० लाख टनांनी उत्पादन वाढेल, असंही युएसडीएनं म्हटले आहे. भारत, अमेरिकेतीची स्थिती पाहून युएसडीएनं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदा ४१ लाख टनांनी कमी राहीलं असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन १ हजार १७४ लाख टनांवर स्थिरावेल. तर भारतातील सोयाबीन उत्पादन ४ लाख टनांनी घटून ११५ लाख टनांवर येईल .

ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वे या देशांमधील नेमकी स्थिती काय –

ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वे या देशांमध्ये आत्ताशी पेरणी सुरु झाली आहे. तसेच यावर्षी सुद्धा कमी पावसाचा परिणाम होताना दिसतोय व ला- नीना स्थितीही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचाही परिणाम पुढील काळात होऊ शकतो. पण आत्ताच याबाबत निश्चित सांगता येत नाही. पुढील काळात वातावरण कसं राहीलं यावरून ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वे या देशांमधील सोयाबीन उत्पादन(Agricultural Information) किती येईल हे ठरेल.

वाचा: फिक्स डिपॉझिटच्या दरात बदल करून , ‘ या ‘ बँकांनी दिली आनंदाची बातमी..

मागच्या हंगामातील अंदाज –

मागील हंगामातही प्रारंभीच म्हणजेच १२ ऑक्टोबर २०२१ च्या अहवालात युएसडीएनं ब्राझीलमध्ये १४४० लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र अंतिम उत्पादन १२७० लाख टन मिळालं. तर अर्जेंटीनामध्ये ५१० लाख टन उत्पादन होईल, असं म्हटलं होतं. पण केवळ ४४० लाख टनांवर उत्पादन स्थिरावलं होतं. पेरुग्वेतील उत्पादनाचा अंदाज १०५ लाख टनांचा असताना केवळ ४२ लाख टन उत्पादन मिळालं. तर चीनमध्ये १९० लाख टन उत्पादन (Agricultural Information)होईल असं सांगितलं असताना १६४ लाख टन उत्पादन हाती आले . पीक वाढीच्या आणि काढणीच्या काळात पाऊस आणि वातावरण कसं राहतं यावर या देशांमधील सोयाबीन उत्पादन अवलंबून राहील.

अधिक उत्पादन वाढीसाठी व रोगराईमुक्त सोयाबीन जातींचा शोध…

बाजारात कोणतं सोयाबीन ?

सध्या केवळ अमेरिका आणि भारतात नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाले आहे व त्यामुळं बाजाराचं लक्ष या दोन देशांतील सोयाबीन उत्पादनावर आहे. त्यातच युएसडीएनं यंदा भारत आणि अमेरिकेतील उत्पादनात(Agricultural Information) घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे . त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात जाणवलाय. युएसडीएच्या अहवालानंतर सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे मागील दोन महिन्यांतील उचांकी पातळीवर पोचले होते. वायद्यांनी गुरुवारी १४.०४ डाॅलर प्रतिबुशेल्सचा कमाल दर गाठला होता. त्यानंतर त्यात काहीशी घट होऊन १३.९३ डाॅलरवर स्थिरावले.

वाचा: बिग अपडेट: पिकांचं नुकसान झाल्यास 72 तासात करा तक्रार; नाहीतर नाही मिळणार पीकविमा; पहा कस कराल तक्रार…

देशातील दरपातळी काय आहे –

पावसाचा फटका निश्चितच सोयाबीन पिकाला बसत आहे . महाराष्ट्र, मध्य प्रेदश आणि राजस्थान या महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये नुकसान (Agricultural Information)वाढलंय. त्यामुळं बाजारभावात सुधारणा पाहायला मिळाली. सध्या बाजार समित्यांमध्ये नव्या सोयाबीनला ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तर जूनं सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान विकलं जातंय. तसचं प्रक्रिया प्लांट्सचे भाव हे ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या बाजारभावात चढ-उतार होत असले तरी शेतकऱ्यांना किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे .

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title : Know according to the global production of soybeans, will the price of soybeans increase or decrease..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button