ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Soybean Rate | मार्केट गाजण्यास पुन्हा सुरुवात! आज देशात सोयाबीन आणि कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Soybean Rate | शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची पाबातमी समोर आली आहे. ही बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. कारण सध्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर (Soybean Rate) दबावात आहेत. यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी ( Agriculture) चिंतेत पडले आहेत. परंतू, आता मार्केट पुन्हा गाजणार आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला (Soybean Rate) पुन्हा एकदा चांगला दर मिळणार आहे. तसेच आज सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग देशात सोयाबीन आणि कापसाचे दर किती रुपयांनी सुधारले आहेत ते जाणून घेऊयात.

सोयाबीन उत्पादकांना दिलासा
सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आज देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरामध्ये (Financial) काहीशी सुधारणा झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक दिवसांपासून दबावत असलेले सोयाबीनचे दर वाढतात की काय अशी आशा शेतकऱ्यांमध्ये लागली आहे.

किती रुपयांनी वाढले दर?
आज आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झाली. तर आज दुपारपर्यंत सोयाबीन वायदे 15.42 सेंट प्रतिबुशेल्सवर होते. तसेच सोयापेंडच्या वायद्यांमध्येही सुधारणा देखील सुधारणा होऊन हे वायदे 498 डाॅलरवर पोचले होते. तर आज देशातील बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये प्रतिक्विंटल 100 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल 5 हजार 100 ते 5 हजार 500 रुपये इतका दर मिळत आहे. तसेच सोयाबीनच्या दरात वाढ होण्यासाठी अनुकूल स्थिती झाली असल्याचे देखील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

कापसाचे दर वाढण्यास अनुकूल परिस्थिती
सोयाबीनप्रमाणे कापसाच्या दरात देखील आज देशातील बाजारपेठेत सुधारणा झालेली पाहायला मिळाली. तसेच देशातील कापसाच्या आवकेत देखील काहीशी सुधारणा झाली आहे. कापसाचे उत्पादन देखील कमी झाले आहे. दरामुळे शेतकरी कापूस दाबून ठेवत आहेत. तर दुसरीकडे कापसाची निर्यात सुरू झाली आहे. त्यामुळे आता कापसाचे दर सुधारण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कापसाच्या दरात चांगली सुधारणा होऊ शकते.

किती मिळाला कापसाला भाव?
कापसाच्या दराबद्दल बोलायचे झाले, तर आज देशातील काही बाजारांत कापसाच्या दरात सुधारणा झालेली पाहायला मिळाली. कापसाच्या दरात प्रति क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली. तर बाजारात आज कापसाला 8 हजार ते 8 हजार 500 रुपये दर मिळाला. तसेच येणारे 10 ते 15 दिवस कापसाचे दर दबावात राहू शकतात. त्यानंतर दरात सुधारणा होणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The market began to roar again! Soybean and cotton prices in the country today increased by

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button