ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

“ही” औषधी वनस्पती शेती पाहिलीत का? 3 महिन्यात 3 लाखाची कमाई; वाचा आणि करा “ही” औषधी वनस्पती शेती…

Have you seen "this" herb farming? 3 lakh earnings in 3 months; Read and do "this" herb farming

नैसर्गिक वनौषधीचा (Natural herbs) वापर करून अनेक आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात. कच्चा माल काढून तो विकू शकतो कच्चा मालाला जास्त मागणी असते. शेतकरी मोठ्या प्रमाणत औषधी वनस्पतींची लागवड लागवडीतून उत्पादन घेत असतात. औषधी वनस्पती शेतीला (Medicinal plant farming) जमीन कमी लागते व खर्चही कमी होतो. कमी कालावधीत मध्ये अधिक उत्पादन देणारे तसेच कमाई कायमस्वरूपात राहणारी ही औषधी वनस्पती. आपण खर्च वेळ फायदा या सर्व विषयाची माहिती घेऊया…

तुळशी (Basil), आर्टेमिसिया अॅनुआ, ज्येष्ठमध, कोरफड इत्यादी औषधी वनस्पतींची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. या शेतीसाठी खर्च फक्त हजार, दोन हजार येतो पण यातून होणारी कमाई लाखोंमध्ये असते.

तुळशीची शेती – खोकला, श्वसनाचे आजार तसेच सर्दी फक्त यावर नाही तर कर्करोगावरही तुळस गुणकारी असते.
घरगुती औषधांमध्ये (Home remedies) तुळशीचा अधिक प्रमाणात केला जातो. युजेनॉल आणि मिथाइल सिनामेट असलेल्या तुळस कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील औषधे तयार करण्यासाठी करतात. म्हणून तुळशीची शेती व्यवसाय अधिक प्रमाणात पुढे जाताना दिसत आहे. तुळशीच्या बिया (Basil seeds) आणि तेलाची बाजारपेठ मोठी आहे. तुळशीचे बियाणे आणि तेल यांचा दर पण कमी जास्त होत असतात.

उत्पन्न – एका हेक्टरमध्ये तुळस पिकवण्यासाठी फक्त 15 हजार रुपये खर्च येतो आणि 3 महिन्यांनंतर या पिकातून 3 लाखापर्यंत उत्पन्न निघू शकते. पतंजली, डाबर, वैद्यनाथ अशा आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या तुळशीची कंत्राटी शेती घेतात या कंपन्या तुळशीची शेती करण्यासाठी बियाणे, अन्य आवश्यक मदतीसह पीक खरेदीची हमीही देतात. यात करावा लागणारा खर्च खूप कमी असतो व मिळणारे रक्कम अधिक. या शेतीचे सतत दर वाढ होत असते त्यामुळे या शेतीची जबाबदारी घेऊन व्यवसाय करणे फायद्याचेच ठरेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button