ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शेळी-मेंढीपालन योजनेचा 6 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ; जाणून घ्या 25 का 75 टक्के मिळणारं अनुदान?

शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या माध्यमातून विविध महत्वाकांक्षी योजना राबवल्या जातात. तसेच महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचे काम केले जाते. तर शेतकरी मित्रांनो आता देखील शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेळी आणि मेंढीपालन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

अर्थ विभागाची योजनेला मंजुरी

तर शेतकरी मित्रांनो शेळी-मेंढी पालन योजनेसाठी सरकारी अनुदान 25 टक्के का 75 टक्के द्यायचे याबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आता निवडणुकांचे वारे वाहू लागल्यामुळे अर्थ विभागाने 75 टक्के सरकारी अनुदान देण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली.

शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदान

राज्य सरकारचे 75 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचा २५ टक्के सहभाग अशा पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे. तर ही महत्त्वाकांक्षी योजना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लवकरच मंजुरीसाठी आणली जाणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकार ‘महाराष्ट्र राज्य शेळी व मेंढी विकास सहकारी महासंघ’ स्थापन करणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

काय आहे महासंघाच्या स्थापनेचा उद्देश?

  • शेळी, मेंढीच्या व्यवसायातून 10 हजार कोटींची उलाढाल अपेक्षित
  • शेतकऱ्यांना स्थिर व वाढीव उत्पन्न मिळावे.
  • रोजगारनिर्मिती वाढविणे आहे.
  • शेळी व मेंढीचे मांस व दुग्ध उत्पादन वाढविणे आहे.
  • मेंढीपासून लोकरनिर्मितीला चालना देणे आहे.
  • दोन टप्प्यांत राबविणार योजना आहे.

Web Title: Big decision for farmers! 6 lakh farmers will benefit from goat-sheep farming scheme; Know 25 or 75 percent subsidy?

दूध उत्पादनातही झाली घट

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button