ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Market Rate | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तुरीच्या दरात ‘या’ महिन्यात येणार तेजी, कापसाच्या दरातही झाली वाढ

Market Rate | सध्या शेतमालाचे भाव स्थिरावले आहेत. यामुळेच शेतकरी चिंतेत आहेत. शेतमालाला म्हणावासा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना (Agriculture) शेतमालाची विक्री करावी की, दाबून ठेवावा असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नियमित शेतमालाचे दर (Market Rate) जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग सध्या (Tur Rate) तुरीला आणि कापसाला काय दर (Cotton Rate) मिळत आहे तसेच आगामी काळात कसा भाव (Market Rate) मिळू शकतो हे जाणून घेऊयात.

वाचानादचखुळा! आता शेतकरी शेती आणि पशुपालनातून कमावणार लाखोंचा नफा, केंद्राच्या ‘या’ योजनांचा घ्या लाभ

बाजारात तुरीला बऱ्यापैकी चांगला दर मिळत आहे. परंतु, मागील आठवड्यात तुरीचे दर (Tur Rate) बाजारात संमिश्र राहिले. ज्याचं कारण म्हणजे आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीला उठाव कमी होता. तर दुसरीकडे देशातील शेतकऱ्यांनी दरामुळे तुर दाबून ठेवली आहे. म्हणूनच देशातील बाजारात तुरीचे दर चढ उतरात राहिले. त्याचंबरोबर सरकारकडून तुरीवरील 10 टक्के असणारे आयात शुल्क देखील काढले.

कधी वाढतील तुरीचे दर?
तुरीचे उत्पादन फारसे झाले नाही. त्याचबरोबर आयातीतून येणाऱ्या तुरीवर देशाची गरज पूर्ण होणार नाही. याच पार्श्वभूमीवर देशातील तुरीचे दर वाढू शकतात. चालू महिन्यात तुरीच्या दारा 100 ते 200 रुपयांचा चढ उतार राहू शकतो. उत्कृष्ट दर्जाच्या तुरीला 8 हजार रुपयांचा दर मिळेल. तुरीची आवक कमी असल्याने पुढील एप्रिल महिन्यात तुरीच्या दरात तेजी येऊ शकते. एप्रिल महिन्यात 9 हजारांवर दर जाऊ शकतात.

वाचा:शेतकऱ्यांनो फक्त 2 हजारांत मिटणार 50वर्षांच्या जमिनीचा वाद! तोही एका झटक्यात; सरकारच्या ‘या’ योजनेतून करा अर्ज

कापसाचे दर सुधारले
कापूस उत्पादकांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे. कारण कापसाच्या दरात आज काहीशी वाढ झालेली पाहायला मिळाली. आज कापसाचे दर 100 रुपयांनी सुधारले. तर आज कापसाला सरासरी 7 हजार 800 ते 8 हजार 400 रुपये इतका दर मिळाला. तसेच कापसाच्या जास्तही नरमाई येऊ शकत नाही, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! The price of Turi will rise in this month, the price of cotton has also increased

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button