ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Toll Tax | वाहन चालकांना मोठा झटका! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ, जाणून घ्या कधी होणार नवे दर लागू?

Toll Tax | केंद्र सरकार पुन्हा एकदा महागाईचा झटका देण्याची तयारी करत आहे. यावेळी रस्त्यावर वाहन चालवणे महाग होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अंमलबजावणी युनिट (PIU) एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गांवरील टोल टॅक्स (Toll Tax) वाढवण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत 1 एप्रिलपासून NHAI टोल दरात (Toll Tax) 5 ते 10 टक्क्यांनी वाढ करू शकते. म्हणजेच, राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर तुमचे वाहन चालवणे महाग होणार आहे.

टोल टॅक्स किती वाढू शकतो?
विशेष म्हणजे एक्स्प्रेस वेवर सध्या 2.19 रुपये प्रति किलोमीटर दराने टोल टॅक्स (Toll Tax Rate) वसूल केला जात आहे. आता त्यात 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. सुधारित टोल दरांचा प्रस्ताव 25 मार्चपर्यंत सर्व PIUs कडून पाठवला जाईल. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या मंजुरीनंतर 1 एप्रिलपासून त्यांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. कार आणि हलक्या वाहनांसाठी टोल दरात 5 टक्के वाढ, अवजड वाहनांसाठी टोल टॅक्स 10 टक्क्यांनी वाढू शकतो.

वाचा: शेतकऱ्यांनो एलआयसीच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून मुलांचे भविष्य करा सुरक्षित, जाणून घ्या फायदे

राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर टोलचे दर वाढतील
ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे, मेरठ-दिल्ली एक्सप्रेसवे ते यमुना एक्सप्रेसवे या मार्गावरील टोलचे दर वाढणार आहेत आणि १ एप्रिलपासून या आलिशान महामार्गांवर प्रवास करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.

द्रुतगती मार्गावर वाहनांची वर्दळ सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे एक्स्प्रेस वेवर सध्या दररोज सुमारे 20 हजार वाहने ये-जा करतात. एक्स्प्रेस वेवर ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका अंदाजानुसार, आगामी काळात एक्सप्रेस वेवरून दररोज सुमारे 50 ते 60 हजार वाहने ये-जा करतील.

वाचा: कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांद्याला प्रतिक्विंटल मिळणार अनुदान, जाणून घ्या 200 की 500 रुपये?

जनतेला सर्वत्र महागाईचा करावा लागत आहे सामना
जनतेला सर्वत्र महागाईचा सामना करावा लागत असून अलीकडेच 1 मार्च रोजी व्यावसायिक आणि घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली असून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 350.50 रुपयांची वाढ झाली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A big blow to drivers! Increase in the rate of toll tax on the highway, know when the new rate will be applicable?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button