ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

अखेर पीक विमा खात्यात जमा; पीक विम्यासह या जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांची क्लेम पात्र..

Finally credited to the crop insurance account; As many as 1 lakh 32 thousand farmers in this district are eligible for crop insurance.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. बुलढाणा , जालना , परभणी , हिंगोली , उस्मानाबाद या जिल्ह्याच्या पीक विम्याच्या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या (Reliance General Insurance Company) माध्यमातून १० जिल्ह्यामध्ये पीक विमा योजना राबविली जाते. गोंदिया, परभणी, बुलढाणा, जालना अशा काही जिल्ह्यांसाठी आधिसूचना काढण्यात आल्या आहेत. वाशिम जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश आहे.

वाचा –

या जिल्ह्यांच्या आधी सूचना काढल्यानंतर सुद्धा, पीक विमा कंपणीच्या मध्यमातून २०२० चा पीक विमा हप्ते शासनाच्या माध्यमातून दिले आम्हाला मिळाले नसल्याचे कारण सांगून २०२१ पीक विम्याच वाटप अद्याप देखील केलेले नव्हते. या कंपनीच्या माध्यमातून आता पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.

रिलायन्स कंपनीच्या (Reliance Company) माध्यमातून ज्या १० जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजना राबविली जाते. या १० जिल्ह्यामधून जवळ जवळ १७ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. गोंदिया, परभणी, बुलढाणा, जालना अशा १० जिल्ह्यांना २५ टक्के अग्रिम रक्कम वाटप करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा –

हिंगोली –

हिंगोली जिल्ह्यात उडीद आणि सोयाबीन या पिकांसाठी आधीसूचना काढण्यात आलेल्या होत्या. याच आधिसूचनाच्या आधारे हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ ४८ हजार ८५१ शेतकरी पात्र करण्यात आलेले होते. ज्यांच्यासाठी १९ कोटी ७६ लाख पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. यापैकी १९ कोटी ५७ लाख वाटप रुपयांचे वाटप झालेले आहे. या जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार शेतकऱ्यांनी क्लेम केले होते यापैकी १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांची क्लेम पात्र झालेले आहेत. यासाठी ४२ कोटी ३४ लाख हिंगोली साठी पीक विमा मंजूर झालेला आहे. यापैकी जवळजवळ ७० लाख शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना मंजुर करून त्यांचे वाटप देखील करण्यात आलेल आहे.

उस्मानाबाद –

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बजाज अलायन्स माध्यमातून १० हजार प्रती हेक्टर विमा दिल जाणार होता यामध्ये १३ हजार ते १६ हजार अशा प्रकारे वाटप करण्यासाठी मंजूरी देण्यात आली होती ती ६ डिसेंबर २०२१ पासून शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केला जाईल सांगण्यात आले होते, तो कालपासून क्रेडिट होयला देखील सुरुवात झाली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button