ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

ब्रेकींग न्यूज: बाजारात आला भन्नाट ट्रॅक्टर! कमी किंमतीचा ‘हा’ ट्रॅक्टर फक्त 80 रुपयांत शेतात 6 तास करणारं काम

Tractor | भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथे नियमितपणे नवीन ईव्ही मॉडेल्स लाँच होत आहेत. एवढेच नाही, तर सामान्य वाहनांबरोबरच कृषी वाहनांनाही (Agricultural Vehicle) इलेक्ट्रिक फॉर्म दिले जात आहे. होय, गुजरातमधील एका शेतकऱ्याने (Agriculture) आपल्या मेहनतीच्या जोरावर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवला आहे. त्याला मारुत ई-ट्रॅक्ट 3.0 (Marut E-Tract 3.0) असे नाव देण्यात आले आहे.

गुजरात आधारित कंपनीचे पहिले ईव्ही उत्पादन आहे. हे बनवण्यासाठी 4 वर्षे लागली. मारुत ई-ऍग्रोटेक कंपनीचे (Agri News) संचालक निकुंज किशोर कोरात यांनी या ट्रॅक्टरबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दिल्लीतील इलेक्ट्रिक (Electric Tractor) ऑटो रिक्षा पाहून हा ट्रॅक्टर बनवण्याची कल्पना 5 वर्षांपूर्वी सुचली आणि 2018 पासून ते बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याने या प्रोटोटाइप ई ट्रॅक्टरमध्ये (Department of Agriculture) 11kW क्षमतेचा बॅटरी पॅक वापरला आहे. त्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनीअरिंग केले आहे.

वाचा:खर्च आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशक

भारतीय पार्ट आलेत वापरण्यात
हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवण्यासाठी 98 टक्के मेड-इन-इंडिया पार्ट्स (Made-in-India Parts) वापरण्यात आले आहेत. तर त्याचा कंट्रोलर अमेरिकेच्या कंपनीचा आहे. स्वदेशी पार्ट वापरल्यामुळे त्याची किंमत खूपच कमी आहे.

कामगिरी कशी आहे?
मारुत ई-ट्रॅक्टमध्ये 11kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. जो रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यात 3KW ची इलेक्ट्रिक मोटर आहे. ही बॅटरी 15 अँपिअरच्या घरगुती सॉकेटमधून चार्ज केली जाऊ शकते. ज्यासाठी फक्त 4 तास लागतात आणि हा ट्रॅक्टर एका चार्जवर 6 ते 8 तास काम करू शकतो.

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले जबरदस्त निर्णय! थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात होणार वाढ

इंधनाची होणार आहे मोठी बचत
एक सामान्य ट्रॅक्टर एक तास काम करण्यासाठी 1.5 ते 2 लिटर डिझेल वापरतो. मात्र या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये केवळ 10 युनिट वीज खर्च करून 8 तास काम करता येते. म्हणजे हे 8 तास चालवण्याचा खर्च फक्त रु.80 (₹8/युनिट वीज) असेल. तर डिझेल ट्रॅक्टरच्या एवढ्या कामासाठी सुमारे 500 ते 550 रुपये खर्च करावे लागतात. या संदर्भात, हा ट्रॅक्टर पर्यावरण, जंगल आणि हवामानासाठी देखील अतिशय अनुकूल आहे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

कामगिरी कशी आहे?
मारुत ई-ट्रॅक्टमध्ये ट्रॉली आणि इतर शेती उपकरणे देखील जोडली जाऊ शकतात. हा ट्रॅक्टर दीड टन भार वाहून नेण्यास सक्षम आहे.

खर्च किती असेल?
हे मॉडेल सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पण निकुंजच्या मते, त्याची सुरुवातीची किंमत 5.5 लाख रुपये असू शकते. तसेच सरकारी अनुदानामुळे त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते. 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये ते सादर करण्याची योजना आहे. यासोबतच यामध्ये सोलर पॅनल्सचाही वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे त्याची बॅटरी चार्ज करता येईल. त्याच्या बॅटरीला 3000 तास किंवा 3 वर्षांची वॉरंटी मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: An amazing tractor is in the market! Low cost tractor for 80 rupees only 6 hours work in the field

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button