ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

मागील वर्षातील फलोत्पादन व शेततळ्याचे अनुदान वितरित करणार; सोबत नवीन अनुदान जाहीर..

Distribute previous year's horticulture and farm subsidy; Along with announcing new grants ..

बाबासाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी शेतकरी (Farmers) आहेत त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. 2019-20 तसेच 2020-21 मधी 55 टक्के अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आणि यापुढे सुद्धा 80 टक्के अनुदान मिळणार असल्याचे फलोत्पादन (Horticulture) मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय झाला आहे.

2019-20 मधील बऱ्याच लाभार्थ्यांचे राहिलेल्या अनुदानाबाबत विचार-

बाबासाहेब फुंडकर फळबाग योजना (Orchard scheme) राज्यात राबवली जाते यामधील 2019-20 मधील या योजनेचे अनुदान अजूनही बऱ्याच जणांना मिळालेलं नाही. तक्रारीही यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत. फलोत्पादन (Horticulture) मंत्र्यांच्या बैठकीत आदेश करण्यात आले आहेत की तातडीने कारवाई केली जावी व ज्यांचे अनुदान बाकी आहे त्यांना लवकरात लवकर वितरित केले जावे अशी सूचना फलोत्पादन मंत्री श्री संदीपान भुमरे यांनी बैठकीत दिली आहे.

फलोत्पादन (Horticulture) संदर्भातील ज्या काही योजना आहे तसेच याबाबतीत विविध विकास कामे आहेत याचाही त्यांनी आढावा घेतला आहे. बैठकीमध्ये श्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे कृषी सचिव श्री. एकनाथजी डवले तसेच राज्याचे कृषी आयुक्त धीरज कृमार व संचालक डॉ. के.मोने यांच्या उपस्थित बैठक पार पडली.

स्ट्रॉबेरी फळ योजनामध्ये नवीन गोष्टींचा समावेश करण्याचा विचार-

स्ट्रॉबेरी (Strawberry) या फळाच्या उत्पादन मनरेगा अंतर्गत ज्या काही फळबागा योजना (Orchard scheme) राबवल्या जात असतील त्याबाबत काही समावेश करता येईल का विचार चालू आहे याच्याबद्दल आवाहन देखील मागवले असल्याचे सांगितले आहे. फळबाग लागवडीसाठी (Orchard planting) कलमांची रोपे शेतकऱ्यांना मिळावी यासाठी राज्यामध्ये असलेल्या १४३ शासकीय रोपवाटिका (Nursery) पूर्णपणे पूर्ण क्षमतेने कार्यरत असावे याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

8 ते 10 दिवसात अनुदान दिले जाणार आहे-

२०२० व २०२१ मधील योजनेसाठी फक्त ४० टक्के निधी देणार असल्याचे सांगितले आहे या योजनेसाठी वाढीव निधी दिला जाईल व ८ ते १० दिवसामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून अनुदान (Grants) देणार असल्याचे सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button