ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Asteroid Danger| पृथ्वी संकटात? नासाचा इशारा, महाकाय लघुग्रह येतोय पृथ्वीच्या दिशेनं; काय घडणार वाचा सविस्तर

Asteroid Danger| आपली आकाशगंगा (Galaxy) ही अजूनही आपल्यासाठी एक गूढच आहे. अनेक ग्रह, शेकडो लघुग्रह (Asteroid) इत्यादींनी आपली आकाशगंगा व्यापलेली आहे. मात्र आपण बुद्धिमान प्राणी. आकाशगंगेत काय काय घडत असतं यावर विविध अवकाश संशोधन संस्था लक्ष ठेवून असतात. यामध्ये अग्रगण्य आहे ती अमेरिकेची नासा (NASA). याच नासाने एक धोक्याचा इशारा दिला आहे. 150 फुटांचा एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. या लघुग्रहाचा आकार एका मोठ्या विमानाएवढा असल्याचं बोललं जात आहे.

वाचा: खुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

कसा आहे लघुग्रह

या लघुग्रहाचं ‘2023 FZ3’ असं नामकरण करण्यात आलं आहे. हा लघुग्रह ताशी 67 हजार 656 किलोमीटर वेगानं पृथ्वीकडे मार्गक्रमण करीत आहे. तो सहा एप्रिलला पृथ्वीच्या जवळ येऊ शकतो. एका मोठ्या विमानाच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीवर आढळला तर काय होणार या संभ्रमात सगळं जग आहे.

पृथ्वी संकटात?

यापूर्वीही अनेकदा काही लघुग्रहांची आणि पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र लघुग्रहांनी आपली दिशा बदलल्यामुळे असं काही घडलं नव्हतं. आताच्या या लघुग्रहामुळे पृथ्वी संकटात आहे का याचं उत्तर नासानं दिलं आहे. नासानं या संदर्भात एक अहवाल जारी केला आहे. त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की या लघुग्रहामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. यामुळे सुटकेचा निःश्वास सोडण्यास काहीच हरकत नाही.

वाचा:  विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

इतरही लघुग्रहांचं प्रयाण

या लघुग्रहा व्यतिरिक्त इतर काही लघुग्रह पृथ्वीच्या जवळ पोहोचणार आहेत. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने याबाबत माहिती दिली आहे. लघुग्रह FU6, FS11, FA7, FQ7 हे लघुग्रह येत्या काही दिवसात पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचतील.

अशी ठेवली जाते नजर
तुम्हाला प्रश्न पडला असेल की या लघुग्रहांची माहिती नासाला कशी मिळते? नासा अशा लघुग्रहांवर कायम नजर ठेवून असते. नासा आपल्या लघुग्रह वॉच डॅशबोर्डद्वारे अशा ग्रहांवर नजर ठेवते. या डॅशबोर्ड मध्ये लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येण्याची तारीख, आकार, पृथ्वीपासूनचे अंतर आणि त्या लघुग्रहाचा व्यास दिसतो. यांना ‘पृथ्वीजवळील वस्तू’ (NEO) असं संबोधण्यात येतं. नासाच्या म्हणण्यानुसार पुढील शंभर वर्षात पृथ्वीला लघुग्रहांमुळे कोणताच धोका नाही.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button