ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

ब्रेकिंग! शेतकऱ्यांनो पीक पाहणीची नोंद जोडणार थेट पीक विम्याला, जाणून घ्या अन्यथा होईल मोठं नुकसान

Crop Insurance | केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यांच्या माध्यमातून विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) सहाय्य (प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023)दिले जाते. एकदा शासनाकडून दिला जाणारा या योजनांचा लाभ घेताना काही अपात्र शेतकरी खोटे पुरावे दाखवत त्या योजनांचा लाभ घेतात. त्यामुळे पात्र असलेले शेतकरी (Department of Agriculture) या योजनांपासून तसेच राज्य शासनाकडून दिलेल्या जातीला जाणाऱ्या आर्थिक (Finance) सहाय्यापासून वंचित राहतात. यासाठी राज्य शासन एक मोठा निर्णय(प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023) घेण्याच्या तयारीत आहे, चला तर मग याबाबात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शेतकरी मदतीपासून वंचित
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 (PM Crop Insurance Scheme 2023) या योजनेमार्फत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना सदर पिकासाठी क्लेम करावा लागतो. परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, काही अपात्र शेतकरी (Agricultural Information) खोटे पुरावे दाखवत या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे खरंच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, ते शेतकरी या मदतीपासून वंचित राहत आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा थकलेला पीक विमा 15 दिवसात खात्यावर होणार जमा

पीक पाहणीची नोंद जोडणार पीक विम्याला
यालाच आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही हालचाली सुरू झाले आहेत. आता पिक पाहण्याची नोंद थेट पिक विम्याला (Crop Insurance) जोडली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमार्फत होणारी ही फसवणूक टळणार आहे. तसेच या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जागृत राहून ही माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: लिंबूवर्गीय (संत्री)फळझाडाची अशी करा लागवड.. मिळवून देईल भरघोस उत्पन्न!

खोटे पुरावे दाखवून घेतला जातोय लाभ
याबाबत राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांच्याकडून अलीकडेच पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील राख गावात शेतकऱ्यांची एक बैठक घेण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी मूळ शेतकऱ्यांना अंधारात ठेवत विमा अर्ज भरले जात आहेत, हीच फसवणूक टाळण्यासाठी ही जोडणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “सध्या ई-पीकपाहणी स्वतः शेतकरी करतात. हीच नोंद परस्पर विमा प्रणालीकडे गेल्यास त्रयस्तांकडून होणारे गैरप्रकार थांबतील,” असेही ते म्हणाले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Farmers will add crop inspection records directly to crop insurance, know otherwise there will be huge losses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button