ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा थकलेला पीक विमा 15 दिवसात खात्यावर होणार जमा

Crop Insurance | नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (crop insurance scheme) पिक विम्याची रक्कम ही दिली जाते. शेतकऱ्यांच्या पीकाचे जास्त नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना (agriculture) 25 टक्के आगाऊ पिक विमा दिला जातो. अशा परिस्थितीत मागील खरीप हंगामात (kharip season) नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मंजूर करण्यात आली होती. परंतु या विम्यातील केवळ 85 टक्के रक्कम शेतकऱ्यांना (department of agriculture) वितरित करण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही उर्वरित निधी अडकून आहे.

25 टक्के आगाऊ रक्कम
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (agricultural information) 25 टक्के आगाव रक्कम म्हणजेच जवळपास 367 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीमधील 85 टक्के म्हणजेच 310 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आले होते. याच 367 कोटीमधील 85 टक्के तर निधी वितरीत झाला, परंतु उर्वरित निधीच्या प्रतीक्षेत अद्यापही शेतकरी आहेत.

कशामुळे थकला पीक विमा?
367 कोटींपैकी 85 टक्के शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्यात आला. यानुसार नांदेड जिल्ह्यातील जवळपास 13 हजार 757 शेतकऱ्यांचा तब्बल 5 कोटी 28 लाखांचा विमा थकला आहे. हा निधी तांत्रिक अडचणीमुळे थकला असल्याचे सांगितले जात आहे.

कधी मिळणार पिक विमा?
आता उर्वरित शेतकऱ्यांना या विम्याची रक्कम कधी मिळते हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. यावर बँकांकडून माहिती मिळाली की, शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर हा पीक विमा जमा होणार आहे, अशी माहिती पीक विमा कंपनीच्या सूत्राने दिली आहे. 15 ते 20 दिवसांमध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: farmers of nanded district have almost 1.55 crores of outstanding crop insurance, the account will be deposited on day

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button