ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Cotton Rates| कापूस, सोयाबीनच्या दरात होणार वाढ, तुरीचं काय? जाणून घ्या सविस्तर

Cotton rates| नेहमीप्रमाणे शेतकरी यंदाही आपल्या मालाची विक्री करताना दिसत नाहीत. सोयाबीन, कापूस आणि तुरीचा साठा शेतकऱ्यांनी करून ठेवला आहे. यामागे शेतकऱ्यांना दरवाढीची आशा आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून दरांची स्थिती थोडीशी कमकुवतच आहे. यामुळे शेतकरी आता काय करणार असा प्रश्न आहे. म्हणून येत्या काळातील सोयाबीन, कापूस आणि तूर यांच्या दरातील चढ-उतार पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा: बाप रे! मगरीच्या तोंडात जाऊनही माणूस जिवंत, तुम्हीच पाहा विश्वास न बसणारा व्हिडिओ

कापसाचे दर वाढणार

गेल्या वर्षी कापसाला (Cotton) शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 12 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. हा भाव अगदी शेवटच्या टप्प्यात मिळाला होता. गेल्यावर्षीप्रमाणे देशात कापसाचे उत्पादन कमीच राहणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांना गतसाली साधारणपणे 8 हजार ते 8 हजार 500 रुपये भाव मिळाला होता. यंदा तो 10 हजार रुपये मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला नव्हता. डिसेंबर, जानेवारीतही बाजारातील आवक कमी होती. मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आवक वाढली. देशात झालेल्या 313 लाख गाठी कापूस उत्पादनापैकी 200 लाख गाठी कापूस बाजारात आला आहे. उर्वरित कापूस व्यापारी, शेतकरी, स्टॉकिस्ट यांच्याकडे आहे. त्यामुळे चालू महिन्यात कापसाचे दर वाढण्याचे संकेत आहेत

सोयाबीनची स्थिती

ऑक्टोबर ते जानेवारी या काळात शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात सोयाबीन (Soyabean) विकला. मात्र आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विक्री वाढवली आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव नीचांकी पातळीवर पोहोचले होते. उद्योगांना सौदे पूर्ण करण्यासाठी सोयाबीनची खरेदी करणे भाग आहे. शेतकऱ्यांकडील सोयाबीनचा साठा बाजारात आल्याने शिल्लक मालाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सोयाबीनची आवक जास्त होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सोयाबीनला 5 हजार रुपये इतका दर मिळाला होता

वाचाही’ अट रद्द करा अन्यथा… कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, अनुदानाच्या लाभात येताहेत अडचणी

तुरीचं काय होणार?

नवी तूर बाजारात येण्याआधीच 7000 रुपयांच्या वर दर होता. याला कारण म्हणजे घटलेली उत्पादक. भारताला दरवर्षी साधारणतः 50 लाख टन तुरीची आवश्यकता असते. गेल्या हंगामातील उत्पादन आणि आयातीमुळे दर कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही. यंदाही लागवड कमीच आहे. तसेच मागील हंगामातील स्टॉकही कमीच आहे. परिणामी तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या 8 ते 9 हजार रुपये इतका दर तुरीला मिळत आहे. मात्र महागाई आटोक्यात ठेवण्याच्या प्रयत्न सरकारकडून काही पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुरीचे दर मंदावू शकतात.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button