ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Electric Bike | काय सांगता? लायसन आणि रजिस्ट्रेशनशिवाय वापरू शकता ‘ही’ बाईक, किंमत आहे फक्त…

Electric Bike |दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशातच पेट्रोलचे दर सुद्धा भडकत आहेत. याची झळ सामान्य माणसांच्या खिशाला बसत असल्याने इलेक्ट्रीक दुचाकींच्या मागणीत वाढ होत आहे. सध्याच्या महागाईच्या जगात लोकांना ‘इलेक्ट्रीक दुचाकी’ हा अगदी स्वस्त आणि मस्त पर्याय वाटतो. दरम्यान पारंपरिक इंधनावरील ताण कमी व्हावा यासाठी सरकार देखील इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देत आहे.

वाचाFruit Crop Insurance | महाराष्ट्रात ‘या’ योजनेंतर्गत 8 फळपिकांना विमा संरक्षण, जाणून कसा होणार फायदा

बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही

दरम्यान आज आपण एका अशाच इलेक्ट्रीक वाहनाबद्दल जाणून घेणार आहोत. खरंतर हे वाहन सायकलच्या श्रेणीत येते. परंतु, जागतिक बाजारपेठेत याची ‘ई-बाईक’ अशी ओळख आहे. या ई-बाईकची खास बात म्हणजे ती चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स व रजिस्ट्रेशनची गरज लागत नाही. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याची किंमत देखील फार कमी असते.

दैनंदिन वापरासाठी चांगला पर्याय

ही ई-बाईक म्हणजेच एस्सेल एनर्जीचे प्रसिद्ध मॉडेल GET 1 ! ही बाईक तुमच्यासाठी सामान्य दैनंदिन वापरासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. यामध्ये एका स्कूटरप्रमाणेच चांगली स्पेस देण्यात आली आहे. तसेच फूटबोर्ड आणि स्टोरेज स्पेससुद्धा देण्यात आली आहे. यामध्ये 16Ah बॅटरी पॅक फुल मॉडेलची किंमत 43,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे तर 13Ah बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत 41,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

वाचा: Subsidy | फूल-फळशेती आणि मसाले पिक लागवडीसाठी ‘या’ योजनेंतर्गत अर्ज सुरू, त्वरित करा ‘असा’ अर्ज

Power & Performance | 50 किमीची ड्रायव्हिंग रेंज

एस्सेल एनर्जी कंपनीचा दावा आहे की, GET1 एका चार्जवर चक्क 50 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते. ही बाईक दोन वेगवेगळ्या लिथियम बॅटरी पॅकसह बाजारात उपलब्ध आहे. 39 किलोच्या GET 1 सायकलमध्ये 250 वॅट्स आणि 48 व्होल्ट क्षमतेची BLDC रियर हब इलेक्ट्रीक मोटर वापरली गेली आहे. यामध्ये बॅटरी रेंजशी संबंधित माहिती देण्यासाठी एक डिस्प्ले देखील उपलब्ध आहे.

ई-बाईकची वैशिष्ट्ये

1) कंपनीकडून बॅटरीसह दोन वर्षांची वॉरंटी व इलेक्ट्रिक कंपोनंट साठी एक वर्षाची गॅरंटी
2) सुरक्षिततेच्या दृष्टीने ब्रेकिंगसाठी मोटर कट ऑफ सिस्टीम देण्यात आली आहे.
3) ड्रायव्हरची सीट ऍडजस्ट करता येऊ शकते.
4) छोटी बॅटरी असलेली सायकल पूर्ण चार्ज व्हायला 5 तास आणि मोठी बॅटरी असलेली सायकल चार्ज व्हायला 6-7 तासांचा कालावधी लागतो.
5) 1 रुपयांत 10 किमी आणि 80 रुपयांत तुम्ही 800 किमीचा प्रवास करून शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Bike can be used without liscence and registration

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button