ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | भाऊसाहेब फुंडकर योजनेसाठी ‘इतक्या’ कोटींच्या निधी वितरणास मान्यता, त्वरित घ्या लाभ

Yojana | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपारिक पिकांसोबतच बागायती पिकांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. विविध राज्यांनी शेतकऱ्यांना (Agriculture) विशिष्ट बागायती पिकांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. तसेच शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले आर्थिक (Financial) उत्पन्न मिळावे यासाठी फळबाग पिकांच्या लागवडीसाठी विविध योजना (Department of Agriculture) राबविण्यात येत आहेत. ज्या योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत.

भाऊसाहेब फुंडकर योजना
राज्यात लाखाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. त्यापैकीच शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान (Orchard Plantation Subsidy) देणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना’ होय. आता याच योजनेसाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

‘इतक्या’ कोटींना मान्यता
आता शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यामध्ये रोजगार हमी योजनेशी निगडित राबविण्यात येणाऱ्या फळबाग लागवड (Orchard Cultivation) योजनेत जे शेतकरी पात्र ठरले नाहीत, त्यांच्याकरता ही योजना राबवण्यात येत आहे. या वर्षासाठी 104 कोटी रुपयांच्या (Financial) कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे. ज्यापैकी 42 कोटी रुपयांच्या निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोणत्या पिकांसाठी मिळणार अनुदान?
शेतकऱ्यांना आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू इत्यादी फळझाडांसाठी या योजनेंतर्गत लागवडीसाठी लाभ मिळेल. त्यामुळे फळबाग लागवडीकरता शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Approval of fund distribution of crores for Bhausaheb Fundkar Yojana, get benefits immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button