ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

ब्रेकिंग! राज्याच्या कृषी आयुक्तपदी सुनील चव्हाण यांची नियुक्ती; बदलणार शेतकऱ्यांचे नशीब

Sunil Chavan | जेव्हा तळागाळातील शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन समस्या पाहून समन्वयाची भावना मनात ठेऊन त्यांचे निराकरण करणारे अधिकारी जेव्हा राज्याचे कृषी आयुक्त (Commissioner of Agriculture) होतात, तेव्हा शेतकऱ्यांचे नशीब कसे बदलेल हे संपूर्ण महाराष्ट्र पाहील. राज्याच्या कृषी आयुक्तपदी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांची नियुक्ती झाली आहे.

वाचा: ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा

आयुक्तपदी निवड होताच घेतले काम हाती
आयुक्तपदी निवड होताच नव्या आयुक्तांनी काम हाती घेतले आहे. “तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत विस्तार उपक्रम पोहोचवतानाच शेतकरी ते ग्राहक यांच्यातील पणन साखळी भक्कम करण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे,” असे नव्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. हे नवे आयुक्त राज्याला लाभल्याने शेतकऱ्यांचे नशीब नक्कीच बदलणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले जबरदस्त निर्णय! थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात होणार वाढ

शेतकऱ्यांचे बदलणार नशीब
शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेत त्यांनी सनदी अधिकारी हे पद मिळवले आहे. शेतकरी कुटुंबातून पुढे आल्याने राज्यातील शेतकऱ्यांचा विकास कसा व्हावा यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहतील. त्यांनी आजपर्यंत तळागाळातील शेतकऱ्यांचे थेट बांधावर जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

शुभेच्छांचा होतोय वर्षाव
आता राज्याच्या कृषी आयुक्तपदी निवड झाल्याने विस्तार कामांना गती येईल. इतकचं नाही, तर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. यामुळेच थेट कृषिमंत्र्यांनीच मुखमंत्र्यांकडे त्यांची कृषी आयुक्तपदी निवड करण्याबाबत आग्रह केला. त्यांच्या कामाचे कौतुक करत आणि नवे कृषी आयुक्तपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Appointment of Sunil Chavan as State Agriculture Commissioner The fate of farmers will change

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button