ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

ब्रेकींग! राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी तब्बल 30 कोटींचा निधी वितरणास प्रशासकीय मान्यता, जाणून घ्या काय मिळणार लाभ?

Administrative approval for disbursement of funds of as much as 30 crores for agricultural mechanization scheme

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यास शासन निर्णय घेऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरण उपअभियानातील वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि औजारे / यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषि औजारे / यंत्रे बँकाना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येत आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

300 कोटींची अर्थसंकल्पिय तरतूद

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी महाडिबीटी पोर्टलवरद्वारे करण्यात येते. या पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेंतर्गत प्राप्त अर्जामधून सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येते. या योजनेसाठी सन 2023-24 या वर्षात 300 कोटी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे.

प्रशासकीय मान्यता

वित्त विभागाच्या दि. 12 एप्रिल 2023 शासन निर्णयातील तरतुदीनुसार व त्यानुषंगाने कृषि विभागाच्या दि. 13 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 100 टक्के राज्य पुरस्कृत योजनांकरिता 70 टक्के मर्यादेत निधी वितरीत करण्यास व प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचनांच्या अनुषंगाने दिनांक 31 मे 2023 च्या शासन निर्णयान्वये राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेस सन 2023-24 मध्ये 210 कोटीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

शासन निर्णय

सन 2023-24 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 30 कोटी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बीडीएस) वितरीत करण्यात येणार आहे. सदर निधी सन 2023-24 साठी खालील लेखाशिर्षाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

काय मिळतो लाभ?

सदर योजनेंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती / जमाती, महिला, अल्प व अ भूधारक शेतकन्यांसाठी किंमतीच्या 50% किंवा रु. 1.25 लाख यापैकी कमी असेल इतर शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या 40% किंवा 1 लाख यापैकी कमी असेल ते या अनुदान देण्यात येते.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Breaking! Administrative approval for the distribution of funds of 30 crores for the state-sponsored agricultural mechanization scheme, know what the benefits will be?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button