lang="en-US"> Aarth Sankalp | फक्त एसटी प्रवासात 50 टक्के सूटचं नाहीतर महिलांसाठी अर्थसंकल्पात केल्या ‘या’ जबरदस्त घोषणा, जाणून घ्या… - मी E-शेतकरी

Aarth Sankalp | फक्त एसटी प्रवासात 50 टक्के सूटचं नाहीतर महिलांसाठी अर्थसंकल्पात केल्या ‘या’ जबरदस्त घोषणा, जाणून घ्या…

Aarth Sankalp | राज्याच्या अर्थसंकल्पात आज महिलांसाठी सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे . राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना (Aarth Sankalp) राज्यांतर्गत प्रवास करताना केवळ अर्धे तिकीट मोजावे लागणार आहे. महिलांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी लवकरच राज्यात सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असून महिला केंद्रीत वाहतूक (Aarth Sankalp) धोरण तयार करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महिलांसाठी उपाययोजना राबवणार
शहरात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्र सरकारच्या मदतीने 50 वसतिगृहे उभारण्यात येणार असल्याची घोषणाही (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्याचा 2023-2024 चा अर्थसंकल्प गुरुवारी येथे सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र मुली आणि महिलांच्या आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि इतरांसाठी अनेक उपाययोजना राबवणार आहे.” याबाबत महाराष्ट्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात (Aarth Sankalp) अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

महिलांसाठी एसटी प्रवास निम्म्या दरात
तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत महिलांना दिली जाणार आहे. महिला खरेदीदारांना घर खरेदी करताना 1 टक्के सूट देण्यात आली आहे. सध्याच्या अटींनुसार, महिला 15 वर्षांपर्यंत पुरुष खरेदीदाराला घर विकू शकत नाही. ही अट शिथिल करून इतर सवलती दिल्या जातील.

महिलांसाठी केल्या मोठ्या घोषणा

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Women now get 50 percent discount on ST travel, Devendra Fadnavis’s big announcements for women in the budget

Exit mobile version