ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy |50 हजारांच्या अनुदानाबाबत मोठं अपडेट; लाभार्थी यादीचे ‘हे’ ऑनलाईन पोर्टल सुरू

Subsidy | शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 2017-18-19-20 या कालावधीत किमान दोन वर्षे पीक कर्ज (Crop Loan) घेतले असेल आणि ते त्या पीक कर्जाची परतफेड केली असेल, अशा शेतकऱ्यांना (Agriculture) राज्य सरकारकडून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या बँकांमध्ये (Financial) आल्या आहेत. जेथे जाऊन शेतकरी या याद्या तपासू शकतात. त्याचबरोबर आता ऑनलाईन स्वरूपात देखील शेतकरी या याद्या तपासू शकणार आहेत.

ऑनलाईन पोर्टल सुरू
नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात येते. ज्यासाठी आता CSC चे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ज्यावर लाभार्थी याद्या प्रकाशित केल्या जातील. मात्र, हे पोर्टल सध्या केवळ लॉगिन होत आहे. ज्यावर लाभार्थी याद्या अद्याप अपडेट झाल्या नाही. परंतु आता पोर्टल सुरू झाले आहे त्यामुळे लवकरच या पोर्टलवर शेतकऱ्यांना लाभार्थी याद्या उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे CSC चे पोर्टल चेक करावे. जेणेकरून या याद्या अपलोड झाल्या की, तुम्ही त्या पाहू शकता.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात

प्रोत्साहन अनुदानासाठी 50 टक्के निधी वितरित
आता याच 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी 50 टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी 2 हजार 350 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. मात्र लगेच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी शासन निर्णयात काही अटी शर्ती आणि तरतुदी देण्यात आल्या आहेत. ज्याचे बायोमेट्रिककेली जाईल. या अटी, शर्ती यांची पूर्तता करूनच शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाईल. ज्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. मात्र, 50 टक्के निधी वितरित झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

वाचा: पीएम किसानच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; लाभार्थी यादीत त्वरित तपासा तुमचे नाव

शेतकऱ्यांनी लिंकिंग प्रक्रिया करणे आवश्यक
शेतकऱ्यांनी आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे. अन्यथा हे अनुदान मिळण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करावे लागेल. जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच तुमचे नाव या लाभार्थी यादीमध्ये येईल. अन्यथा तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A big update on the grant of 50 thousand online portal of beneficiary list started

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button